शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंडळ अधिकार्‍यास मागितली २५ लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:44 IST

अकोला : पातूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकार्‍याला त्याच्या मुलाचे बरे-वाईट करण्याची मोबाइलवर धमकी देऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पातूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकार्‍याला त्याच्या मुलाचे बरे-वाईट करण्याची मोबाइलवर धमकी देऊन २५ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.सस्तीचे मंडळ अधिकारी तथा लहान उमरीतील उत्तरा कॉलनीतील रहिवासी महादेव प्रल्हाद सरप (५0) २४ सप्टेंबर रोजी घरी असताना त्यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. सदर अनोळखी व्यक्तीने मंडळ अधिकारी सरप यांना नागपूर क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगून २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागपूर क्राइम ब्रँचला तातडीने हजर राहण्याचे सांगितले; मात्र सरप यांनी याकडे दुर्लक्ष केले. तब्बल एक महिन्यानंतर २९ ऑक्टोबर २0१७ रोजी परत त्यांना दुसर्‍या अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. तुम्ही नोकरीमध्ये अवैधरीत्या भरपूर पैसे कमाविले असून, तुमची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार झाली असल्याचे सांगत चौकशीसाठी तातडीने हजर राहण्याचे या मोबाइल कॉलवर सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना ३0 ऑक्टोबर रोजी परत कॉल आल्यानंतर राधाकृष्ण टॉकीजजवळ भेटण्यास बोलाविले. सरप या ठिकाणावर गेले असता प्रशांत अजाबराव म्हैसने (रा. अकोला) असे नाव सांगून एका युवकाने त्यांना २५ लाख रुपयांची मागणी केली. तुमची दोन्ही मुले नागपूर येथे शिक्षण घेत आहेत. तुम्ही पैसे दिले नाही, तर तुमची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करून तुम्हाला कारागृहात टाकण्याची धमकी यावेळी प्रशांत म्हैसने नाव सांगत असलेल्या व्यक्तीने सरप यांना दिली. पैसे न दिल्यास नागपूर येथील मुलाला गायब करण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे महादेव सरप घाबरल्याने त्यांनी खंडणी बहाद्दरास २५ लाख रुपये देण्यासाठी सात दिवसांचा अवधी मागितला. खंडणी बहाद्दराने त्यांना सात दिवसांचा अवधी दिला. त्यानंतर मंगळवारी सरप यांना खंडणी बहाद्दर म्हैसने याने खोलेश्‍वर येथील हनुमान मंदिराजवळ २५ लाख रुपये घेऊन बोलाविले; मात्र त्यांच्याकडे इतके पैसे नसल्याने त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून महादेव सरप यांना भेटण्यासाठी आलेला खंडणी बहाद्दर प्रशांत म्हैसने नाव सांगत असलेल्या युवकास अटक केली. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा