शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील शाळांना ‘आरटीई’ प्रतिपूर्तीची दोन कोटी रुपये मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 13:20 IST

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २0७ शाळा नोंदणीकृत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाच्या शुल्काची अकोला जिल्ह्यातील शाळांसाठी सुमारे २ कोटी रुपयांच्या प्रतिपूर्तीची रक्कम लवकरच मिळणार आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाने तसा दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत २0७ शाळा नोंदणीकृत आहेत.शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार खासगी शाळांमध्ये दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत आहेत. या राखीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची रक्कम हे राज्य शासन देत असते; परंतु गत काही वर्षांपासून शासनाने आरटीई प्रतिपूर्तीची रक्कम जिल्ह्यातील शाळांना दिली नाही. त्यामुळे खासगी शाळांनी यंदा विद्यार्थ्यांना २५ टक्के जागांवर प्रवेश देणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने शाळांना प्रतिपूर्ती रक्कम देण्याचे मान्य केले होते. ही रक्कम देण्यासाठी सातत्याने शाळांकडून मागणी करण्यात येत होती. शैक्षणिक वर्ष २0१८-१९ ची प्रवेश शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम थकीत होती. आता शासनाने निधी मंजूर केला असून, त्या त्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे हा निधी वर्ग केला आहे. अकोला जिल्ह्यात आरटीई अंतर्गत नोंदणी झालेल्या २0७ शाळा आहेत. या शाळांना प्रतिपूर्ती रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी निधीचे वितरण करावेशासनाने जिल्ह्यातील खासगी इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांसाठी २ कोटी १0 लाख ६0 हजार रुपये प्रतिपूर्ती रक्कम मंजूर केली आहे. मंजूर झालेल्या निधीचे शाळांना तातडीने वितरण करण्याची मागणी शाळा संचालकांनी केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळा