शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘आरपीएफ’च्या पोलीस निरीक्षकांसह तिघे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 15:32 IST

अकोला : गायगाव पेट्रोल डेपोतील पेट्रोल चोरी प्रकरणात निष्काळजी करणाऱ्या ‘आरपीएफ’चे पोलीस निरीक्षक विनोद कुमार लांजीवार, या ठाण्यातील पोलीस कर्मचारी आर. एन. यादव आणि प्रशांत मगर यांना निलंबित करण्यात आले आहे.

अकोला : गायगाव पेट्रोल डेपोतील पेट्रोल चोरी प्रकरणात निष्काळजी करणाऱ्या ‘आरपीएफ’चे पोलीस निरीक्षक विनोद कुमार लांजीवार, या ठाण्यातील पोलीस कर्मचारी आर. एन. यादव आणि प्रशांत मगर यांना निलंबित करण्यात आले आहे. रेल्वेच्या पेट्रोल वॅगनमधील पेट्रोल चोरी करताना उरळ पोलिसांनी रंगेहात अटक केली होती. त्यामुळे आरपीएफचा कारभार रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांना निलंबित केल्याच्या वृत्ताला भुसावळ रेल्वे मंडळाचे सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांनी दुजोरा दिला आहे.उरळचे ठाणेदार सतीश पाटील यांनी आॅगस्ट महिन्यामध्ये रेल्वे वॅगनमधील तसेच कंपन्यांच्या डेपोतील पेट्रोल चोरट्यांना रंगेहात अटक केली होती. ७ आॅगस्ट रोजी रात्री ठाणेदर पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी रात्रभर पाळत ठेवून पेट्रोल चोरट्यांची मोठी टोळीच जेरबंद केली होती. यामध्ये साहब खान समशेर खान, सुधाकर भिकाजी रनवरे, अक्षय प्रकाश आगरकर, रूपेश रमेश भाकरे, गणेश रामकृष्ण भाकरे, शिवहरी प्रकाश भाकरे या टोळीचा समावेश होता. या टोळीतील तिघे जण फरार होण्यात यशस्वी झाले होते. याप्रकरणी गायगाव डेपोचे कार्यपालन अधिकारी गोविंदकुमार मुंदडा यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला; मात्र काही दिवसांतच या प्रकरणाचा तपास शेगाव आरपीएफकडे देण्यात आला. त्यांच्या चौकशीत हा प्रकार आरपीएफच्या पाठबळामुळेच झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद लांजीवार, पोलीस कर्मचारी आर. एन. यादव आणि प्रशांत मगर यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस