शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच एकर कपाशीवर फिरवला ‘रोटाव्हेटर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:33 IST

मुरलीधर पाटील यांनी पाच एकर शेतातील कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला.

- संतोष गव्हाळे  लोकमत न्यूज नेटवर्कहातरुण : परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केली. शेतात पिकापेक्षा गवत वाढले. पाने व फुले गळतीने कपाशीच्या शेतात फक्त झाडेच उभी होती. लावलेला खर्चही वसूल होत नसल्याची शक्यता वाढल्याने हातरूण येथील मुरलीधर पाटील यांनी पाच एकर शेतातील कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला.खारपाणपट्ट्यातील शेतशिवारात कपाशीचे पीक शेतकऱ्यांना चार पैसे हाती देईल, अशा उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने पिकांची स्थिती विदारक झाली. शेतकरी मुरलीधर पाटील यांचे अंदुरा भाग दोन शिवारात मोर्णा नदी काठालगत गट नंबर २१६ मध्ये ५.५ एकर शेती आहे. सन २०१६ मध्ये बँकेचे एक लाख ८५ हजार कर्ज काढले होते. नंतर कर्जाचे पुनर्गठन केले. २०१६ चे पुनर्गठन असूनसुद्धा कर्जमाफी मिळाली नाही. कर्जासाठी बँकेच्या चकरा मारल्या; मात्र निराशा झाली. सावकाराकडून खरीप हंगामातील पेरणीसाठी कर्ज काढले. त्यानंतर संपूर्ण शेतीसाठी १५ हजार रुपयांचे बियाणे घेतले. पेरणीचा खर्च १० हजार रुपये झाला. मशागतीसाठी शेतीला १० हजार लागले. निंदण मजुरी ३० हजार असा एकूण ६५ हजार रुपये खर्च लागला. सतत तीन महिने पाऊस सुरू राहल्याने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. हिरवे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे कपाशीच्या पाने व फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली. बोंड्यातून बाहेर आालेला कापूस वेचणी न झाल्याने भिजला असून, कापसाचा सडा शेतशिवारात पडला आहे. कपाशीची बोंडे सडली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. पिकासाठी लावलेला खर्चही वसूल होणार नसल्याने निराश होऊन संपूर्ण ५.५ एकरातील कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे. दिवाळी सणाला दिवा लावण्यासाठी व पूजेसाठी नवा कापूस घरी नव्हता, अशी भीषण ओल्या दुष्काळाची परिस्थिती ग्रामीण भागात आहे.पिकावर रोटाव्हेटर मारल्यानंतर रब्बी हंगामासाठी पैसा नाही. वर्षभर घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न आहे.सावकाराचे कर्ज डोक्यावर आहे. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. नुकसानाचे पंचनामे अजून झाले नाहीत. मदत पदरात कधी पडेल, या प्रश्नांसह भविष्याची चिंता शेतकरी मुरलीधर पाटील यांनी व्यक्त केली.

तीन शेतकऱ्यांनी कपाशी मोडली!यावर्षीच्या खरीप हंगामात सतत पाऊस सुरू राहिल्याने शेती मशागतीची कामे करता आली नाही. कपाशी पीक सततच्या पावसामुळे पिवळे पडले असून, फुले आणि पात्या गळतीमुळे पिकाची स्थिती चिंताजनक झाली. पेरणीपासून कपाशी पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नव्हता, त्यामुळे आठ एकर कपाशी पिकावर रोटाव्हेटर फिरवला असल्याची माहिती अंदुरा भाग दोन शेतकरी गजानन ठाकरे, पाच एकर कपाशी पीक मोडल्याची माहिती शेतकरी गजानन पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

कापसाची शेती यावर्षी तोट्याची ठरली. लागलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने ५.५ एकर शेतातील कपाशीवर रोटाव्हेटर फिरवला. कर्जाचा डोंगर कायम असून, सरकारी मदत पदरात कधी पडेल, याकडे लक्ष लागले आहे.- मुरलीधर पाटील,शेतकरी हातरुण.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी