शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित संचमान्यता शिक्षकांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 11:22 IST

प्रस्तावित संचमान्यता धोरणामुळे शिक्षकांची संख्या घटणार आहे

अकोला : राज्यातील प्रस्तावित संचमान्यता धोरणामुळे शिक्षकांची संख्या घटणार आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येणार असल्याने, शिक्षण संस्थासंचालकांनी प्रस्तावित संचमान्यते विरोधात दंड थोपटले आहेत.राज्यात सध्या २८ आॅगस्ट २0१५ च्या शासन निणर्यानुसार प्राथमिक शिक्षणासाठी ३0 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षणासाठी ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, माध्यमिक शिक्षणासाठी ६0 विद्यार्थ्यांमागे तीन व त्यापुढे ४0 प्रमाणे एक अशा प्रकारची संचमान्यता आहे. त्यानुसारच शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. त्यात बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिकसाठी ४0 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, उच्च प्राथमिकसाठी ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशा प्रकारची संचमान्यता प्रस्तावित केली आहे. त्याचबरोबर २५ पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद करण्यात येणार आहेत. यातून अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे. भविष्यात निर्माण होणारी अनेक पदे नाहिशी होणार आहेत. मराठी शाळा टिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या वाढविणे आवश्यक असताना, शासनाकडून मात्र, शिक्षकांच्या संख्येत कपात करण्याचे धोरण राबविले जात आहे. या प्रस्तावित संचमान्यतेविरोधात भूमिका घेण्यासाठी अकोला जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळ व शिक्षण क्षेत्रातील संघटना पदाधिकाऱ्यांची एक बैठक गुरुवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्था संचालक मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय कौसल होते. बैठकीला अ‍ॅड. विलास वखरे, सचिन जोशी, सुरेश खोटरे, आनंद साधू, विजयसिंह गहिलोत, प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, विलास अत्रे, सागर देशमुख, प्रशांत जानोळकर, प्रा. नरेंद्र लखाडे, संतोष मानकर, रमेश ठाकरे, दिनेश काठोके, दिलीप कडू, दिनकर कडू, संभाजी डाबेराव, पुष्पा गुलवाडे, बळीराम झामरे, दिनेश तायडे, श्यामशील भोपळे, अशोक घाटे, अरुण लौटे, पी.एम. लसनकार, प्रा. प्रवीण ढोणे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक