शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांचा हैदोस; लाखोंचा मुद्देमाल लंपास

By आशीष गावंडे | Updated: June 28, 2024 00:07 IST

न्यू आळशी प्लॉट येथील घटना

आशिष गावंडे, अकोला: शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या न्यू आळशी प्लॉट येथील रहिवासी प्रख्यात उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी हैदोस घालत शस्त्रांचा धाक दाखवून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. दरोडेखोरांनी चार चाकी वाहनातून पळ काढला. दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या न्यू आळशी प्लॉटमध्ये उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी कुटुंबातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे केडिया कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन धंदर त्यांच्या ताफ्यासह किडिया यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत धाडसी चोरी, दरोडय़ाची मालिका 

खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सहकार नगर मध्ये भरतीया नामक उद्योजकाकडे धाडसी चोरी झाल्याची घटना ६ मे रोजी उघडकीस आली होती. त्यानंतरही या पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेक चोऱ्या झाल्या. आता न्यू आळशी प्लॉटमध्ये पडलेल्या सशस्त्र दरोड्यामुळे खदान पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.दरोडेखोरांच्या तपासासाठी आम्ही संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. -सतीश कुलकर्णी, शहर पोलीस उपअधीक्षक अकोला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी