शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘ओरडू नका, नाहीतर तुमच्या मुलाला मुंबईत मारुन टाकू’

By आशीष गावंडे | Updated: June 28, 2024 21:13 IST

केडिया यांच्या निवासस्थानी पाेलिसांच्या वेषात आलेल्या चाेरट्यांचा हैदाेस

आशिष गावंडे, अकाेला: जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू आळशी प्लॉट येथील उद्योजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी पाेलिसांच्या वेषात आलेल्या चाेरट्यांनी बंदूक व चाकूच्या धाकावर हैदाेस घातल्याचे शुक्रवारी समाेर आले. घरात शिरलेल्या चाेरट्यांनी केडिया यांच्या गळ्याला चाकू लावत ‘ओरडू नका, नाहीतर तुमच्या मुलाला मुंबइत जीवे मारुन टाकू’अशी धमकी दिल्याचे केडिया यांनी पाेलिस तक्रारीत नमुद केले. याप्रकरणी शुक्रवारी खदान पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या न्यू आळशी प्लॉटमध्ये उद्योजक नवलकिशाेर केडिया यांच्या निवासस्थानी २७ जून राेजी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी शिरकाव केला. यातील एका चाेरट्याने पाेलिसांचा गणवेश परिधान केला हाेता. एका मुलीचा शाेध घेत असल्याचे सांगत चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. या इसमांची वर्तणूक संशयास्पद असल्याचे ध्यानात येताच केडिया यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी यातील एका चाेरट्याने केडिया यांच्या गळ्याला चाकू लावत ‘तुमच्या मुलाला मुंबइत मारुन टाकू,त्याठिकाणी आमची माणसे उभी आहेत’, अशी धमकी देत लुटमार केली. घरातील माेलकरणींच्या कानातील साेन्याचा दागिना हिसकावून घेत कपाटात शाेधाशाेध केली. जे हातात येइल ते घाइघाइत लुटून चाेरट्यांनी चारचाकी वाहनातून पळ काढला. याप्रकरणी खदान पाेलिसांत भादंवि कलम ३९२, ३९७, ४५२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांकडून कसून शाेध

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके यांनी तपासकामी पथके रवाना केली आहेत. आराेपींचा सुगावा लागल्यास ९९२१०३८१११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून याेग्य ते बक्षिस दिले जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी