२५ लाख खिशात घालणारा काेण?
एकीकडे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच दुसरीकडे परभणी येथील संबंधित कंत्राटदाराकडून तब्बल २५ लाख रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. याप्रकरणी शासनाने चाैकशीचे आदेश दिल्यानंतरही २५ लाख खिशात घालणारा व्यक्ती काेण, असा सवाल उपस्थित झाला आहे.
दाेन्ही आमदारांत जुंपणार
हायब्रिड ॲन्युइटीअंतर्गत तयार हाेणाऱ्या रस्त्याचे बहुतांश काम शिवसेनेचे आ. नितीन देशमुख यांच्या बाळापूर मतदारसंघात हाेत आहे. यामध्ये पारस, निमकर्दा, गायगाव, गाेरेगाव ते माझाेड, भरतपूर, नकाशी, वाडेगाव ते पातूरचा समावेश असून आ. बाजाेरियांच्या तक्रारीमुळे रस्ते कामाला खीळ बसण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आगामी दिवसांत या दाेन्ही आमदारांत चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत.
कंत्राटदारांची बांधकाममंत्र्यांकडे धाव
दरम्यान, याप्रकरणी संबंधित कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशाेकराव चव्हाण यांच्याकडे धाव घेऊन इत्थंभूत माहिती सादर केल्याचे बाेलल्या जात आहे.