रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:18 AM2021-01-22T04:18:00+5:302021-01-22T04:18:00+5:30

व्यापाऱ्यांकडून राम मंदिरासाठी निधी अकाेला : शहरातील न्यू क्लॉथ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गुरुवारी अयाेध्येतील राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी १ ...

Road repairs begin | रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Next

व्यापाऱ्यांकडून राम मंदिरासाठी निधी

अकाेला : शहरातील न्यू क्लॉथ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गुरुवारी अयाेध्येतील राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी दिला. या वेळी आ. गोवर्धन शर्मा, गोपालजी खंडेलवाल, रवी भुसारी, किशोर मांगटे पाटील, प्रकाश लोढाया, इंदरचंद अरोरा, जसवंत कावणा, प्रकाश घोगलिया, मुकेश भाटिया, श्यामराव केंदरकर, सुनील गनोजे आदी उपस्थित हाेते.

सिव्हिल लाइन रस्त्याची दुरुस्ती

अकाेला : शहरातील नेहरू पार्क चाैक ते सिव्हिल लाइन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहीन ठरला आहे. दरम्यान, सिव्हिल लाइन चाैकात सिमेंट रस्त्यावर उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली हाेती. अखेर मंगळवारी कंत्राटदाराने या चाैकातील रस्त्याची दुरुस्ती केली.

नागरिकांचे उघड्यावर वास्तव्य

अकाेला : शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठी मनपाने निवारा उभारला आहे. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाची आवारभिंत, सार्वजिनक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या आवारभिंतीलगत बेघर नागरिकांचे वास्तव्य दिसून येत आहे. या प्रकाराची मनपाने दखल घेण्याची गरज आहे.

नालीची उंची वाढवली; रहिवासी त्रस्त

अकाेला : अग्रेसन चाैकासमाेर क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने माेठी नाली खाेदण्यात आली. सिमेंट नालीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी नालीची उंची वाढल्यामुळे रामदास पेठ भागाकडे जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

मुख्य नाला घाणीने तुडुंब

अकाेला : शहरातील माेहन भाजी भंडारजवळील मुख्य नाला घाणीने तुडुंब साचला आहे. नाल्यात प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाॅटलचा खच साचल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी तुंबल्यामुळे स्थानिक रहिवाशांना घाण, दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

डम्पिंग ग्राउंडवर धूर; नागरिकांच्या जीवाला धाेका

अकाेला : नायगाव येथे मनपाच्या डम्पिंग ग्राउंडवर शहरातील कचऱ्याची साठवणूक केली जाते. कचऱ्याला आग लागून धूर निघत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धाेका निर्माण झाला आहे. धुरामुळे श्वास घेण्यास अडचण हाेत असून हवा प्रदूषित झाली आहे.

रेल्वे स्टेशन चाैकात पाण्याची नासाडी

अकाेला : रेल्वे स्टेशन चाैकात महापालिकेचे दाेन जलकुंभ आहेत. यापैकी एका जलकुंभातून अकाेटफैल परिसराला पाणीपुरवठा केला जाताे. अकाेटफैल भागातील उड्डाणपुलालगतच्या भागात व्हाॅल्व नादुरुस्त झाल्याने या ठिकाणी पाण्याचा माेठ्या प्रमाणात अपव्यय हाेत आहे. याकडे मनपाच्या जलप्रदाय विभागाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

परिसरात साचले पाणी

अकाेला : जुने शहरातील हरिहरपेठमध्ये मनपाच्या जलकुंभातून सातत्याने पाण्याचा विसर्ग हाेताे. पाण्याच्या आऊटलेटमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने जलकुंभाचा परिसर जलमय झाला आहे. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी जलप्रदाय विभाग पुढाकार घेईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

मैदानाला काटेरी झुडपांचा विळखा

अकाेला : जुने शहरातील डाबकी राेडवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाला काटेरी झुडपांनी विळखा घातला असून अतिक्रमकांनी झाेपड्या उभारल्याचे समाेर आले आहे. मैदानालगत नागरिकांच्या सुविधेसाठी सार्वजनिक शाैचालय असून त्या ठिकाणीसुद्धा लाकूड व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.

Web Title: Road repairs begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.