शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील ६५५ शाळांमध्ये आरओ वॉटर प्युरिफायर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 11:04 IST

उर्वरित १00 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष निधीसाठी शासनाकडे शिफारस सादर करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी विकास निधीतून जिल्ह्यातील ९४५ शाळांपैकी ६५५ शाळांमधील क्लासरूम डिजिटल केल्या असून, या शाळांमध्ये आरओ वॉटर प्युरिफायरसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. आता सर्वच शासकीय शाळा डिजिटल करण्यासाठी आमदार डॉ. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. शाळा डिजिटल आणि आरओ वॉटर प्युरिफायर उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने त्यांचा शुक्रवारी सत्कार केला.जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे आणि त्यांना स्वच्छ पाणी प्यायला मिळावे. तसेच सर्वच शासकीय शाळा डिजिटल व्हाव्यात, यासाठी आमदार डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळे या निधीतून प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांसह एकूण ९४५ शाळांपैकी ६५५ शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम आणि आरओ वॉटर प्युरिफायर उपलब्ध झाले आहे. आता उर्वरित १00 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष निधीसाठी शासनाकडे शिफारस सादर करण्यात आली आहे. राहिलेल्या सर्व शाळांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून साहित्य देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल होणार आहेत. या कार्यासाठी आमदार डॉ. रणजित पाटील यांचा शुक्रवारी राज्य शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्यवाह सचिन काठोळे यांनी सत्कार केला. यावेळी विश्वास पोहरे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, अरुण वाघमारे, रामभाऊ मालोकार, सुनील माणिकराव, गजानन काळे, किशोर चतरकर, श्याम कुलट, नितीन बंडावार, मोहम्मद वसिमोद्दीन, दिनेश भटकर, देवेंद्र वाकचवरे, चंद्रशेखर पेठे, संतोष वाघमारे, रवींद्र आवारे, विजय धनाडे, संतोष इंगळे, मोहसीन खान, अनिल भाकरे, संदीप मानकर, विजय वाकोडे, धर्मेंद्र चव्हाण, विष्णू झामरे, गजानन शेवलकर, मनोज वाडकर, गजानन गोतरकर, सुभाष ढोकणे, वंदना बोर्डे व अंजली मानकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलSchoolशाळा