शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकट मुलाखत : दोन घटनांनी ‘प्रश्नचिन्ह’ निर्माण झाले - मतीन भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 11:12 IST

७ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी मतीन भोसले यांची प्रकट मुलाखत झाली.

- नीलिमा शिंगणे-जगड  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आयुष्यात असे काही प्रसंग येतात, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. माझ्याही आयुष्यात असे दोन प्रसंग आले की, ज्यामुळे मी पूर्णपणे बदलत गेलो. एक म्हणजे फासे पारधी समाजाची दोन मुले नाल्याच्या पुरात वाहून गेले आणि दुसरा म्हणजे मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर भीक मागत असताना दोन भीक मागणारी मुले रेल्वेखाली कटून मरण पावली. हे दृश्य एवढे विदारक होते की, मी त्याप्रसंगी आत्महत्येचा विचार केला; मात्र याच प्रसंगातून सावरू न प्रश्नचिन्ह ही भटक्या आणि आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण देणारी संस्थेची निर्मिती झाली, असे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांनी सांगितले.७ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात शनिवारी मतीन भोसले यांची प्रकट मुलाखत झाली. मुलाखत कवी किशोर बळी यांनी घेतली. मतीन भोसले यांचा जीवन प्रवास एकेका प्रसंगातून उलगडत गेला. एवढ्या कष्टातून उभारलेल्या प्रश्नचिन्हावर मात्र आज प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. त्याचे उत्तर विद्यमान सरकारने द्यायला पाहिजे. समृद्धी महामार्गामुळे प्रश्नचिन्ह संस्था उद्ध्वस्त झाली आहे. प्रश्नचिन्हसाठीचा संघर्ष एका वळणावर असतानाच समृद्धीची कुºहाड प्रश्नचिन्हावर पडली. लोकवर्गणीतून १ कोटी ७७ हजार मदत मिळाली होती. यामधून वर्गखोल्या, वाचनालय, २५० झाडे लावून प्रश्नचिन्हची इमारत दिमाखात उभी राहिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री बच्चू कडू यांनी लक्ष घातल्यास नव्याने प्रश्नचिन्हाचा प्रवास सुरू होऊ शकतो, असे भोसले म्हणाले.पारधी समाजाच्या माथ्यावर चोर हा शिक्का बसलेला आहे. पारधी समाजातील मुले, आदिवासी मुले, रस्त्यावर भीक मागणारी मुले यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शाळा सुरू केली. शाळा चालविण्यासाठी पैसे लागतात. यासाठी भीक मांगो आंदोलन सुरू केले. या आंदोलनात लोकांकडून केवळ एक रुपया मागत होतो. या आंदोलनादरम्यान २१ दिवसांत २८ पोलीस केसेस दाखल झाल्या.मुलांची तस्करी करतात, त्यांच्या किडन्या काढतात, राजस्थानमध्ये मुली विकतात, अशा प्रकारचे आरोप लावण्यात आले होते. याच दरम्यान कारागृहातही डांबण्यात आले. कारागृहातील हा विलक्षण अनुभव होता, असेदेखील भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :rashtrasant tukdoji maharaj vichar sahitya samelanराष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनAkolaअकोलाinterviewमुलाखत