शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन फसवणुकीतील साडेतीन लाखांची रक्कम मिळविली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:19 IST

यासोबतच आॅनलाइन खरेदी तसेच हॅकर्सपासून सावधान राहण्याचे आवाहन सायबर सेल तसेच स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

अकोला : आॅनलाइन खरेदी तसेच विविध मदतीसाठी अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यांनी सांगितलेली प्रक्रिया करणाऱ्या अनेकांची आॅनलाइन फसवणूक केल्यानंतर त्यांनी अकोला सायबर सेलकडे तक्रार करताच सायबर सेलने अशा विविध प्रकरणात गत काही दिवसात तब्बल तीन लाख ५० हजार रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्याची कारवाई केली. यासोबतच आॅनलाइन खरेदी तसेच हॅकर्सपासून सावधान राहण्याचे आवाहन सायबर सेल तसेच स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.जठारपेठ येथील रहिवासी प्रसाद कुलकर्णी यांनी एका आॅनलाइन साईटवरून शॉपिंग केली. यामध्ये आॅनलाइन विकत घेतलेले शर्ट हे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे प्रसाद यांनी गुगलवरून कंपनीचा कस्टमर केअर नंबर शोधून त्यावर संपर्क साधला. कस्टमर केअरमधील व्यक्तीने पैसे परत करण्याचे सांगत एक अप्लीकेशन डाउनलोड करायला सांगितले. त्यानंतर बँक डिटेल्स घेऊन कुळकर्णी यांच्या बँक खात्यातून १५ जुलै रोजी एक लाख रुपये परस्पर काढले. हा प्रकार प्रसादच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सायबर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारावर ६० हजार रुपये परत मिळविले तसेच ४० हजार रुपये मिळविण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसºया प्रकरणात चंद्रकांत दादाराव धोटे यांचे ७ जुलै रोजी फोन पे चे खाते बंद होणार असल्याचे सांगत त्यांच्या खात्यातील १० हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली होती. फसवणूक झाल्याचे धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून सायबर पोलिसांनी काही वेळातच त्यांची १० हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली. या दोघांसोबतच गत तीन महिन्यात आॅनलाइन फसवणूक झालेली तीन लाख ५० हजार रुपयांची रक्कम परत आणण्यात अकोला सायबर पोलिसांना यश आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला