शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

११ हजारांची बॅग केली परत, ऑटोरिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

By admin | Updated: December 31, 2014 00:50 IST

वाहतूक पोलिसांनी दाखविली दक्षता.

अकोला : प्राध्यापकांना शिकवणी शुल्कापोटी देण्याकरिता आणलेल्या ११ हजार रुपयांची बॅग बारावीत शिकणारा तरुण शहरातील टॉवर चौकात ऑटोरिक्षातच विसरला. ऑटोरिक्षा मलकापूरमध्ये गेल्यावर चालकाला हे लक्षात आले. सदर ऑटोरिक्षाचालकाने परत टॉवर चौक गाठून ती बॅग युवकाला परत केली. ही घटना ३0 डिसेंबर रोजी दुपारी घडली.बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील वरुड या गावातील रहिवासी असलेला हृषीकेश दुनारे हा अकोला येथे बारावीचे शिक्षण घेतो. मंगळवारी दुपारी तो शिकवणीचे ११ हजार रुपये प्राध्यापकांना देण्यासाठी बॅगेत घेऊन शहरात आला होता. टॉवर चौकात उतरल्यानंतर तो बॅग ऑटोरिक्षातच विसरला. हृषीकेशला उतरून दिल्यानंतर चालक विजय इंगळे हा ऑटोरिक्षा घेऊन मलकापूरला गेला. त्यानंतर हृषीकेशला बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्याने चौकातील वाहतूक पोलिसांकडे जाऊन बॅग विसरल्याचे तसेच त्यामध्ये ११ हजार रुपये असल्याचेही सांगितले. पैसे परत मिळतील की नाही, या चिंतेने हृषीकेशला रडू कोसळले होते. चौकातील वाहतूक पोलीस संजय इंगळे व शरद इंगळे यांनी त्याचे सांत्वन करीत, कोणत्या ऑटोत, कोणत्या ठिकाणाहून बसला, याची माहिती घेतली. मात्र, त्याच्याकडे ऑटोरिक्षाचा क्रमांक नव्हता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी हृषीकेश ज्या ठिकाणी ऑटोरिक्षात बसला त्या ठिकाणी जाऊन तेथे असलेल्या इतर चालकांशी चर्चा केली आणि तो कोणत्या ऑटोरिक्षात बसला, याची माहिती घेतली. त्यांनी दोन ऑटोरिक्षा त्याच्यामागे पाठविल्या. दरम्यान, मलकापूरला पोहोचल्यावर एमएच ३0 - ९६८६ क्रमांकाचा ऑटोरिक्षा असलेला विजय इंगळे यांना प्रवासी बॅग विसरल्याचे लक्षात आले. बॅगेत ११ हजार रुपये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मोहाला बळी न पडता, टॉवर चौकात ऑटोरिक्षा परत आणला आणि वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती दिली. सदर पोलिसांनी विजय इंगळे यांची हृषीकेशशी भेट घालून दिली. बॅग त्याचीच असल्याची खात्री दिल्यानंतर हृषीकेशला पैशांसकट बॅग परत मिळाली. ऑटोरिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतुक केले.