शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

धार्मिक स्थळांलगतचे अतिक्रमण जमीनदोस्त

By admin | Updated: November 6, 2016 02:13 IST

पोलीस बंदोबस्तात अकोला महापालिकेची ऐतिहासिक कारवाई

अकोला, दि. ५- महापालिकेच्या किसनबाई भरतीया रुग्णालयाची जागा तसेच फतेह अली चौकातील धार्मिक स्थळांलगतच्या जागेवर उभारलेले पक्के अतिक्रमण जमीनदोस्त करण्याची ऐतिहासिक कारवाई शनिवारी महापालिका प्रशासनाने पार पडली. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशातून पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर २00९ नंतर उभारलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे महापालिकांना निर्देश आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू केली. मध्यंतरी या कारवाईला ह्यब्रेकह्ण देण्यात आला होता. सणासुदीचे दिवस संपताच मनपा प्रशासनाने शनिवारपासून धार्मिक स्थळे व त्याच्या आडोशाने उभारलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. काश्मीर लॉजनजीकच्या फतेह अली चौकात लाल बंगला ट्रस्टच्या नावे असलेल्या धार्मिक स्थळाच्या बाजूला अतिक्रमित जागेवर हॉल उभारण्यात आला होता. मनपाच्या मालकीच्या किसनबाई भरतीया रुग्णालयाच्या जागेवरील धार्मिक स्थळाच्या बाजूलाही प्रार्थना करण्यासाठी अतिक्रमित जागेवर हॉल बांधण्यात आला होता. मनपाच्या इतिहासात प्रथमच या दोन्ही धार्मिक स्थळांच्या बाजूला उभारण्यात आलेले अतिक्रमण धाराशायी करण्यात आले. स्थगनादेशामुळे यंत्रणा हतबलशहरात अतिक्रमित जागेवर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविणे अपेक्षित असताना त्यांनी न्यायालयाकडून स्थगनादेश मिळविल्याची अनेक प्रकरणे आहेत. अशावेळी संबंधित स्थळांवर कारवाई करताना मनपाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागतो. याबद्दल उपस्थित अधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.खारी बावडीचे दस्तावेज सादर करण्याचे निर्देशकिसनबाई भरतीया रुग्णालयाच्या जागेवर किराणा मार्केट (खारी बावडी) आहे. जिल्हा प्रशासन तसेच मनपाने कधी व किती वर्षांसाठी भाडेतत्त्वावर जागा दिली, याचे दस्तावेज सादर करण्याचे निर्देश आयुक्त अजय लहाने यांनी व्यावसायिकांना यावेळी दिले. आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाईजुन्या बसस्थानकानजिक फतेह अली चौकातील धार्मिक स्थळाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी पक्के अतिक्रमण उभारण्यात आले. मुख्य रस्त्यालगत असणार्‍या सदर अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. मनपाच्या मालकीच्या असलेल्या किसनबाई भरतीया रुग्णालयाच्या जागेवरील धार्मिक स्थळाच्या बाजूला प्रार्थना करण्यासाठी पक्के अतिक्रमण उभारले होते. या दोन्ही ठिकाणी कारवाई करताना महापालिका आयुक्त अजय लहाने सायंकाळपर्यंत उपस्थित होते.मनपा, पोलिसांची संयुक्त मोहीमअतिक्रमण काढताना महापालिका व पोलीस प्रशासनात कमालीचा समन्वय दिसून आला. मनपाच्यावतीने उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, अतिक्रमण विभाग प्रमुख राजेंद्र घनबहाद्दूर, क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे, अनिल बिडवे, कैलास पुंडे, सहायक नगर रचनाकार संदीप गावंडे, विधी विभाग प्रमुख श्याम ठाकू र यांच्यासह शहर पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील माने, पोलीस निरीक्षक अनिल जुमळे व पोलीस क र्मचारी उपस्थित होते.