शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आता भारतीय रेल्वेही घेणार रिलायन्स जीओ ईन्फोकॉमची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 13:05 IST

अकोला: फोर-जी सेवा देऊन देशभरातील टेलिकॉम कंपन्यांना आव्हान उभ्या करणाऱ्या मेसर्स. रिलायन्स जीओ इन्फोकॉम लिमिटेडने आता भारतीय रेल्वे टेलिकॉमची सेवादेखील ताब्यात घेतली आहे

ठळक मुद्दे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी हा महत्त्वपूर्ण करार रिलायन्ससोबत केला आहे. तसे निर्देश दूरसंचार मंत्रालयाकडून २० नोव्हेंबर २०१८ रोजी भारतीय रेल्वे मंत्रालयास देण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या वित्तीय संचालकांसह विविध विभागांच्या कराराची माहितीदेखील यासोबत पाठविण्यात आली आहे.

- संजय खांडेकरअकोला: फोर-जी सेवा देऊन देशभरातील टेलिकॉम कंपन्यांना आव्हान उभ्या करणाऱ्या मेसर्स. रिलायन्स जीओ इन्फोकॉम लिमिटेडने आता भारतीय रेल्वे टेलिकॉमची सेवादेखील ताब्यात घेतली आहे. भारतीय संचार निगम लिमिटेड या सर्वात जुन्या कंपनीला डावलून त्या खात्याचे मंत्री पीयूष गोयल यांनी हा महत्त्वपूर्ण करार रिलायन्ससोबत केला आहे. आगामी १ जानेवारी २०१९ पासून देशभरातील रेल्वे टेलिकॉमची सेवा आता रिलायन्स ताब्यात घेणार असून, तसे निर्देश दूरसंचार मंत्रालयाकडून २० नोव्हेंबर २०१८ रोजी भारतीय रेल्वे मंत्रालयास देण्यात आले आहे.भारत सरकारच्या अखत्यारीत असलेली भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड कंपनी २००७ पासून सातत्याने तोट्यात आहे. त्यामुळे बीएसएनएलमध्ये नोकर भरतीही बंद आहे. खासगी टेलिकॉम-सेल्युलर कंपनीसोबत स्पर्धा करीत तोट्यात जात असलेल्या कंपनीला पुढे आणण्यासाठी मंत्रालयाने कोणतेही नवीन प्रकल्प राबविले नाही; मात्र बीएसएनएल आणि रेल्वे मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री असलेल्या पीयूष गोयल यांनी बीएसएनएलला डावलून रिलायन्सला झुकते माप दिले आहे. रेलटेलचा जुना करार ३१ डिसेंबर २०१८ रोजी मोडीत काढून १ जानेवारी २०१९ पासून ही सेवा रिलायन्स जीओ देणार आहे. दूरसंचार दिल्ली येथील निदेशक हरीश पवारिया यांनी त्यासंबंधीचे निर्देश रेल्वे झोन, मंडळ आणि विभाग अधिकाºयांना यंत्रणा ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहे. रिलायन्स जीओ इन्फोकॉम लिमिटेडने सीयूजी स्कीम अंतर्गत ए, बी, सी, डी असे चार वर्गीकरण करून ही सेवा रेल्वेला दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या वित्तीय संचालकांसह विविध विभागांच्या कराराची माहितीदेखील यासोबत पाठविण्यात आली आहे. या रेलटेलचा घेणार ताबादिल्ली, नोएडा, हरियाणा, मुंबई, चेन्नई, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पंजाब, बिहार, ओडिसा, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, आसाम, नार्थ-ईस्ट, हिमाचल, वेस्ट बंगाल, उत्तर प्रदेश (पूर्व-पश्चिम) रेलटेलची सेवा रिलायन्स लवकरच ताब्यात घेणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेReliance Jioरिलायन्स जिओ