शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रिलायन्सने १२ लाखांचा दंड भरलाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:52 IST

शहरात फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करणार्‍या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने महापालिकेची ९00 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडली होती. या प्रकरणात मनपा प्रशासनाने रिलायन्स कंपनीला बारा लाखांचा दंड आकारला होता. मनपाच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपनीने दंडाची रक्कम भरलीच नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या पत्राला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करणार्‍या रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने महापालिकेची ९00 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फोडली होती. या प्रकरणात मनपा प्रशासनाने रिलायन्स कंपनीला बारा लाखांचा दंड आकारला होता. मनपाच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपनीने दंडाची रक्कम भरलीच नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक विजय इंगळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. दक्षिण झोनमधील कौलखेड, खडकी परिसरात रिलायन्स कंपनीच्यावतीने फोर-जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. २२ सप्टेंबर रोजी खोदकाम करताना, कंपनीकडून अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी ९00 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा खंडित झाला होता. जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी किमान तीन दिवसांचा अवधी लागणार होता. पाइपलाइन फुटल्यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला होता. या प्रकरणाची दखल घेत महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने रिलायन्स कंपनीला पत्र पाठवून जलवाहिनी दुरुस्तीसाठी आठ लाख रुपये आणि पाण्याच्या अपव्यय झाल्यामुळे चार लाख रुपये असा एकूण बारा लाखांचा दंड आकारला होता. दीड महिना उलटून गेल्यानंतरही रिलायन्स कंपनीने मनपाकडे दंडाची रक्कम जमा केली नाही. मनपाकडून कंपनीला झुकते माप दिल्या जात असल्याचा आरोप करीत भाजपचे नगरसेवक विजय इंगळे यांनी मनपासह कंपनीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कंपनीने दंडाने रक्कम जमा न केल्यास, फौजदारी तक्रार करण्याची मागणी नगरसेवक विजय इंगळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

रिलायन्स कंपनीने दंडाची रक्कम भरण्यास विलंब केल्याची बाब मान्य आहे; परंतु कंपनीला कोणतीही सूट न देता, दंडाची रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत कंपनीने दंडाची रक्कम जमा न केल्यास फौजदारी स्वरूपाची तक्रार नोंदविण्याचा मार्ग मोकळा आहे. - सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जलप्रदाय, मनपा.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाReliance Communicationsरिलायन्स कम्युनिकेशन