शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गुलाबराव गावंडेंची स्थानबद्धतेनंतर मुक्तता

By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST

एकीकडे अटकपूर्व जामीन, तर दुसरीकडे पोलिसांनी केले स्थानबद्ध.

अकोला: राज्याचे माजी राज्यमंत्री व अकोला पश्‍चिम मतदारसंघातील शिवसेना उमेदवार गुलाबराव गावंडे यांच्याविरुद्ध बुधवारी दाखल झालेल्या गुन्हय़ाप्रकरणी, त्यांना शनिवारी दु पारी बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्थानबद्ध करण्यात आले होते; मात्र त्याच दरम्यान अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने, त्यांची मुक्तता करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी कौलखेडमधील एका मतदान केंद्रावर साहाय्यक पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी एका इसमास ताब्यात घेतले असता, गुलाबराव गावंडे व त्यांचे सुपुत्र युवराज गावंडे यांनी पोलिसांची अडवणूक केली, अशा आशयाची तक्रार, मुंढे यांच्या वाहनचालकाने बुधवारी रात्री येथील खदान पोलिस ठाण्यात नोंदविली होती. त्यावरून खदान पोलिसांनी गावंडे पिता-पुत्राविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३४१, २२५, ३५३, ५0४, ५0६ व १८६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गावंडे यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर शनिवारी दुपारी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. देशपांडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयाने गुलाबराव गावंडे व युवराज गावंडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच, दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास, बुलडाणा जिल्ह्या तील साखरखेर्डा पोलिसांनी गुलाबराव गावंडे यांना हिवरा आश्रम येथे ताब्यात घेतले व स् थानबद्ध केले. त्यानंतर खदान पोलिसांनी या कारवाईची माहिती न्यायालयास दिली आणि अटकपूर्व जामीन नाकारण्याची विनंती केली; मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत, अटक पूर्व जामीन मंजूर करण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यानुसार नंतर गावंडे यांना मुक्त करण्यात आले.