शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील पुनर्वसित ग्रामस्थांचा तिढा कायम; जमिनी पाहणार मग निर्णय घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:40 IST

अकोट : मेळघाटातून पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होता. त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत ई-क्लासच्या आधी जमिनी पाहणार व मगच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी पुनर्वसित गावकर्‍यांना जंगलाबाहेर काढण्याचा तिढा कायम आहे. 

ठळक मुद्देपुनर्वसित ग्रामस्थांचा जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होतात्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत ई-क्लासच्या आधी जमिनी पाहणार व मगच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाटातून पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा ताफा गेला होता. त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत ई-क्लासच्या आधी जमिनी पाहणार व मगच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी पुनर्वसित गावकर्‍यांना जंगलाबाहेर काढण्याचा तिढा कायम आहे. 

अकोट  व तेल्हारा तालुक्यात मेळघाटातील आठ गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांनी शेत जमिनी मिळण्याकरिता पुन्हा जंगलात जाऊन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री यांनी शेत जमिनी देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. त्यानंतर अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू, आमदार प्रभुदास भिलावेकर, उप वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अमरावती जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अकोट एस.डी.ओ. उदय राजपूत, धारणी एस.डी.ओ. राठोड, अकोट तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, धारणी, चिखलदरा तहसीलदार यांच्यासह प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर व इतर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा केलपाणीला पोहोचला. यावेळी ग्रामस्थांना शासन निर्णयाची माहिती देण्यात आली. उपस्थितांसह आमदार बच्चू कडू यांनी  शासन निर्णय हा तुमच्या आंदोलनाचा विजय असल्याचे समजून सांगितले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शासन निर्णय निघाला, जमिनी शोधल्या, त्यामुळे आपण जंगलातून चला, लोकवस्तीत राहूनसुद्धा प्रश्न सुटू शकतो. प्रश्न जर निकाली निघाला नाही, तर पुन्हा आपण आंदोलन करण्यास मोकळे आहात, असे सांगून शासनाची बाजू मांडली. दरम्यान, पुनर्वसित गावकर्‍यांनी आम्हाला शक्यतोवर धारणी, चिखलदरा या भागात जमिनी देण्यात याव्यात, त्या भागाशी आमचे नाते जुळलेले आहे, असे सांगितले. तसेच देण्यात येणार्‍या ई-क्लासच्या जमिनी पाहण्याचे निमंत्रण शासनाच्यावतीने त्यांना देण्यात आले. याप्रसंगी पुनर्वसित ग्रामस्थांनी त्या जमिनी पाहण्याकरिता  प्रतिनिधींची निवड करण्याकरिता आठ गावांतील गावकर्‍यांची रविवारी बैठक घेण्यात येईल, या बैठकीत ठरल्याप्रमाणे ई-क्लासच्या जमिनी पाहून आल्यानंतर  पुढील निर्णय घेणार असल्याचे ठामपणे अधिकारी व लोकप्रतिनिधींना सांगितले. त्यामुळे जंगलाबाहेर पुनर्वसित गावकर्‍यांना आणण्याकरिता गेलेला फौजफाटा रात्री २ वाजता परतला असून, पुनर्वसित आंदोलनकर्ते अजूनही जंगलात ठिय्या देऊन आहेत. 

टॅग्स :akotअकोटMelghatमेळघाट