नोंदणीसाठी कामगारांच्या रात्रंदिवस लागतात रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:07 AM2020-02-18T11:07:54+5:302020-02-18T11:08:02+5:30

बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरणासाठी जिल्हाभरातील कामगारांना रात्रंदिवस रांगेत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव सोमवारी समोर आले आहे.

Registration for workers : queue in Akola | नोंदणीसाठी कामगारांच्या रात्रंदिवस लागतात रांगा!

नोंदणीसाठी कामगारांच्या रात्रंदिवस लागतात रांगा!

Next

- सदानंद सिरसाट 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरणासाठी जिल्हाभरातील कामगारांना रात्रंदिवस रांगेत उभे राहावे लागत असल्याचे वास्तव सोमवारी समोर आले आहे.
अकोल्यातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात दर आठवड्यात दोनच दिवस हे काम होत आहे. तर एका दिवशी केवळ १५० कामगारांना टोकन देत तेवढ्याच संख्येत नूतनीकरण होत आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील नोंदीत कामगारांची संख्या २२ ते २३ हजार असून, त्यापैकी १६ ते १८ हजार कामगारांना नूतनीकरण करावे लागत आहे. या प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता १५ महिन्यांचा कालावधी त्यासाठी लागणार आहे. तोपर्यंत अनेक कामगारांची नोंदणी मुदतबाह्य होण्याची भीती निर्माण झाली आहे.
राज्यात ‘इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम १९९६’ हा कायदा लागू आहे. त्या कायद्यानुसार बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवणाऱ्या कल्याणकारी मंडळाची स्थापनाही करण्यात आली आहे. मंडळाकडे दरवर्षी प्राप्त होणाºया ८ हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक उत्पन्नातून कल्याणकारी योजना राबवाव्या लागतात. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच नोंदणी प्रमाणपत्राच्या वर्षभराच्या कालावधीच्या मुदतीनंतर ६० दिवसांत नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. अकोला जिल्ह्यात २०१७-१८ या वर्षापर्यंत २२ ते २३ हजार कामगारांनी नोंदणी केली. त्यांच्या नोंदणीची मुदत संपुष्टात आली आहे. तसेच नवीन कामगारांची नोंदणी करण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. नव्याने नोंदणी व नूतनीकरणासाठी जिल्ह्यातील कामगारांची कमालीची कसरत सुरू आहे. त्यासाठी कामगारांना रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे.


रात्री नंबर लावल्यास दुसºया दिवशी संधी
नूतनीकरणासाठी कामगारांच्या गोरक्षण रोडवरील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात जिल्हाभरातील कामगारांच्या रात्रीपासून रांगा लागतात. आठवड्यात दोनच दिवस हे काम केले जाते. रांगेतील १५० कामगारांना टोकन देत त्यांचे काम दिवसभरात केले जाते. त्यामुळे टोकन मिळवण्यासाठी आधीच्या दिवशी सायंकाळपासूनच रांग लागणे सुरू होते. विशेष म्हणजे, तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर तालुक्यातील टोकाच्या गावातील कामगारांना त्यासाठी कमालीचा त्रास होत आहे.


आतापर्यंत १,५०० कामगारांचे नूतनीकरण
आतापर्यंत १,५०० कामगारांची नव्याने नोंदणी व नूतनीकरण झाले आहे. ८ जानेवारीपासून कामाचे १० दिवस मिळाले आहेत. आठवड्यात दोन दिवस, दर दिवशी १५० कामगारांना टोकन, ही गती कायम असल्यास उर्वरित १७ ते १८ कामगारांना १५ महिने लागणार आहेत.


कार्यालयीन मनुष्यबळ तसेच इतरही योजनांचा ताण पाहता आठवड्यातून दोन दिवस या कामाचे नियोजन केले आहे. शासनाकडून येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया आॅनलाइन सुरू होण्याची शक्यता आहे. मुदतीला वेळ असलेल्यांना नूतनीकरणाची त्यामध्ये संधी आहे.
- आशीष खंडारकर, दुकाने निरीक्षक, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, अकोला.

 

Web Title: Registration for workers : queue in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला