शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषिपंपांसाठी अकोला जिल्ह्यातील २,५११ शेतकऱ्यांची नोंदणी

By atul.jaiswal | Updated: June 3, 2023 18:52 IST

अजूनही १२१७ सौर पंप शिल्लक असल्याची माहिती

अतुल जयस्वाल, अकोला: महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत राज्यातील कृषिपंप वीजजोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेंतर्गत चालू वर्षाकरिता अकोला जिल्ह्यासाठी ३७२८ पंपांचे उद्दिष्ट असून, ऑनलाइन पोर्टलवर दि. १७ मे रोजी अर्ज सुविधा उपलब्ध झाल्यापासून १ जूनपर्यंत २,५११ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविता येईल परिणामी त्यांचे जीवन सुगम आणि सुखकर होण्यास मदत होईल या ध्येयाला समोर ठेवून शासनाने शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजना २०२३, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या नवीनतम पीएम कुसुम योजनेचे उद्दिष्ट भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आहे. अपारंपरिक ऊर्जानिर्मिती धोरण- २०२० अंतर्गत प्रतिवर्षी एक लाख याप्रमाणे पुढील ५ वर्षांत ५ लाख पारेषणविरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यास मान्यता दिली आहे. राज्यात हे अभियान स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा) मार्फत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी उपलब्ध नाही, अशा ठिकाणी पारेषणविरहित सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येतील. या योजनेसाठी आतापर्यंत जिल्ह्यातील २,५११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, अजूनही १२१७ सौर पंप शिल्लक असल्याची माहिती आहे. ऑनलाइन पोर्टलवर करा अर्ज

पीएम-कुसुम योजना राबविण्यासाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलवर विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज करावा. सौर कृषिपंपासाठी पुरवठादाराकडून पाच वर्षांसाठीचा सर्वंकष देखभाल व दुरुस्ती करार केला आहे व तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. सौर कृषिपंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यांस हस्तांतरित करण्यात येईल.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी