शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा टक्का व्याजदर कमी करून शिक्षकांना दिला ‘लॉलिपॉप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 12:42 IST

अकोला: जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेने नववर्षामध्ये कर्जावरील व्याजदर १२.५0 टक्क्यांवरून १२ टक्के केला.

अकोला: जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेने नववर्षामध्ये कर्जावरील व्याजदर १२.५0 टक्क्यांवरून १२ टक्के केला. केवळ अर्धा टक्का व्याजदर कमी करून जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेने शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसून शिक्षकांना ‘लॉलिपॉप’ दिला असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. केवळ अर्धा टक्का व्याजदर कमी केल्यामुळे शिक्षकांना कोणताही लाभ होणार नसल्याचे शिक्षक संघटनेसह खातेदार शिक्षकांनी म्हटले आहे. पतसंस्थेला व्याजदर कमीच करायचा होता, तर मग १ टक्का व्याजदर कमी करायला हवा होता, असा टोमणाही शिक्षक संघटनांनी लगावला आहे.शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, त्यांच्या हितासाठी शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली. शिक्षकांचे हित साधण्याची, त्यांच्यासाठी योजना राबविण्याची जबाबदारी पतसंस्थेची आहे. शिक्षकांच्या पैशाच्या बळावर मोठ्या झालेल्या पतसंस्थेने शिक्षकांच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय राबविण्याची गरज आहे; परंतु शिक्षकांचे हित साधण्याऐवजी पतसंस्थेत हेव्यादाव्यांचे राजकारण शिजत आहे. पतसंस्थेचे संचालकच पतसंस्थेच्या कारभारावर बोट ठेवतात. शिक्षक पतसंस्थेने घेतलेल्या सत्कार समारंभावर शिक्षकांनी तर बहिष्कार टाकलाच, शिक्षकांनीसुद्धा बहिष्कार टाकला. दिनदर्शिकेतील चुकांनी तर कळस गाठला. त्यामुळे पतसंस्था सर्वच शिक्षक संघटनांच्या रोषाला बळी पडली. आता पुन्हा पतसंस्थेचा आणखी एक निर्णय वादात सापडला आहे. पतसंस्थेने नववर्षानिमित्त शिक्षक सभासदांना कर्जावरील व्याजदर अर्ध्या टक्क्याने कमी केला आहे. या अर्धा टक्का व्याजदर कमी केल्याने शिक्षकांना काहीही फायदा होणार नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षक सहकारी पतसंस्था गतवर्षी स्वयंपूर्ण झाली आहे. त्यामुळे पतसंस्थेने अर्धा टक्का नव्हे, तर ४ टक्के व्याजदरही कमी केला असता, तरी पतसंस्थेला कोणतेही नुकसान झाले नसते, उलट शिक्षकांना त्याचा लाभ मिळाला असता, असेही शिक्षक आणि शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)आॅगस्ट २0१७ मध्ये शिक्षक सहकारी पतसंस्था स्वयंपूर्ण झाली. त्यामुळे सहकारी बँकेकडून संस्थेला कर्ज घेण्याची गरज नाही. पतसंस्थेने ४ टक्के व्याजदर कमी केला असता, तरी कोणताही आर्थिक बोजा पडला नसता. सहकार कायद्यानुसार ९७ वी घटना दुरुस्ती करून व्याजदर कमी करता येऊ शकला असता. अर्धा टक्का व्याजदर कमी करून शिक्षकांना ‘लॉलिपॉप’ देण्याचा हा प्रकार आहे.-शशिकांत गायकवाड,जिल्हाध्यक्ष कास्ट्राइब शिक्षक संघटना.

यापूर्वी १३ टक्के व्याजदर होता. आता १२ टक्क्यांवर आणला आहे. संस्थेच्या नियमावलीनुसार आम्ही व्याजदर कमी केला. अधिक व्याजदर कमी करण्यासाठी उपविधी दुरुस्ती करावी लागते. गतवर्षीच पतसंस्थेने १७-१८ कोटी रुपयांचे कर्ज फेडले. त्यामुळे कमी व्याजदर योग्य आहे.-विजय टोहरे, अध्यक्ष,जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था.शिक्षक पतसंस्थेने अर्धा टक्का व्याज दर कमी करून शिक्षकांची थट्टा केली. पतसंस्था स्वयंपूर्ण झाल्यामुळे १२ टक्के व्याजदर जास्त आहे. आवश्यकता नसताना पतसंस्थेने नोकरभरती करून अनावश्यक खर्च वाढविला. कायम ठेवींवर ८ टक्के व्याजदर असताना, कर्जावर १२ टक्के व्याजदर घेणे शिक्षकांवर अन्याय आहे.-प्रकाश चतरकार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक