शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

उद्यापासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया; प्रशासन सज्ज असल्याची जिल्हा पाेलिस अधीक्षकांची माहिती

By आशीष गावंडे | Updated: June 17, 2024 20:50 IST

उमेदवारांना शारिरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात बोलविल्या जाणार आहे.

अकाेला: जिल्हा पाेलिस दलाच्यावतीने १९ जून पासून १९५ पाेलिस शिपाइ पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदभरतीसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये १६ हजार १६१ पुरुष उमेदवार, ५ हजार ६९१ महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी पुरु पुरुष उमेवाराची संख्या एक आहे. निमवाडीस्थित पाेलिस मुख्यालयात बुधवारी सकाळी ५ वाजता पासून या प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे. यासाठी पाेलिस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती साेमवारी आयाेजित पत्रकार परिषदेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.

उमेदवारांना शारिरीक तसेच कागदपत्रे पडताळणी चाचणीसाठी पोलिस मुख्यालयात बोलविल्या जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील ८०० पुरुष उमेदवारांना १९ जून व २० जून राेजी तसेच २१ व २२ जून राेजी १हजार उमेदवारांचा समावेश राहील. २४ जून ते १ जुलै या कालावधीत १हजार ५०० उमेदवारांना बोलाविण्यात येइल. २ जुलै राेजी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील १ हजार ६२ पुरुष उमेदवार बोलावल्या जातील. त्यानंतर ३ जुलै राेजी भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, तृतीयपंथी, होमगार्ड, पोलिस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त आदी प्रवर्गातील सर्व पुरुष उमेदवारांना बाेलावून त्यांच्या कागदपत्रांची  पडताळणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली. यावेळी अपर जिल्हा पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पाेलिस निरीक्षक शंकर शेळके उपस्थित हाेते. 

४ जुलै पासून महिला पदासाठी प्रक्रियाआरक्षण प्रर्वगातील महिला उमेदवारांची चाचणी व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया ४ जुलै पासून सुरु हाेइल. ४ जुलै व ५ जुलै या दाेन दिवसांच्या कालावधीत १ हजार ५०० महिला उमेदवार व ६ जुलै राेजी महिला आरक्षणातील उर्वरित १ हजार ५४ महिला उमेदवार तसेच १०२ महिला भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, अनाथ, होमगार्ड, पोलिस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त अशा एकुण १ हजार १५६ महिला उमेदवारांना पडताळणीसाठी बोलविण्यात आले आहे. उर्वरीत १ हजार ५३५ महिला उमेदवारांची पडताळणी ८ जुलै राेजी पार पडेल. ही पदभरती प्रक्रिया १७ दिवस चालणार आहे. रविवारी या प्रक्रियेला विराम दिला जाणार असल्याचे पाेलिस अधीक्षकांनी सांगितले. 

 उमेदवारांना चार दिवसांची मुदतज्या उमेदवारांना पाेलिस पदभरतीसाठी एकाच दिवशी दोन ठिकाणी किंवा लागोपाठ मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी तारीख देण्यात आली असेल, अशा उमेदवारांना एका ठिकाणची पडताळणी आटाेपल्यानंतर दुस-या जिल्हयात जाण्यासाठी किमान ४ दिवसांच्या अंतराने पदभरतीसाठी मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना अडचण असल्यास त्यांनी raunak.sarafa mahait.org यावर ईमेल करावा, असे पाेलिस अधीक्षक सिंह यांनी नमुद केले. 

टॅग्स :Policeपोलिस