शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील पुनर्वसित गावे : १00 कुटुंबांना वाटणार २00 एकर जमीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:48 IST

अकोला : जिल्ह्यातील अकोट  व तेल्हारा  तालुक्यातल्या पुनर्वसित गावातील १00 आदिवासी कुटुंबांना तीन महिन्यात २00 एकर जमीन वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वन विभागाचे अधिकारी संबंधित कुटुंबांना गुरुवारी लेखी देणार आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  बुधवारी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देएसडीओ-तहसीलदार देणार लेखी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील अकोट  व तेल्हारा  तालुक्यातल्या पुनर्वसित गावातील १00 आदिवासी कुटुंबांना तीन महिन्यात २00 एकर जमीन वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वन विभागाचे अधिकारी संबंधित कुटुंबांना गुरुवारी लेखी देणार आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  बुधवारी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रातल्या व्याघ्र प्रकल्पांतर्गत १६ गावांचे अमरावती व अकोला जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामध्ये धारणी व चिखलदरा तालुक्यातील बोरी, कोहा, कुंड, कुलंगणा बु., कुलंगणा खुर्द, नागरतास बु., सोमठाणा बु., व सोमठाणा खुर्द या आठ गावांचे पुनर्वसन अकोला जिल्ह्यातील  अकोट व तेल्हारा तालुक्यात करण्यात आले आहे. या पुनर्वसित गावातील ६५0 प्रकल्पग्रस्तांनी मेळघाटातील त्यांच्या मूळ गावात प्रवेश करून आंदोलन सुरू केले आहे. या पृष्ठभूमीवर पुनर्वसित आठ गावांतील प्रकल्पग्रस्त आदिवासी कुटुंबांना पुनर्वसित गावांच्या सभोवताली २00 एकर ई-क्लास जमीन उपलब्ध होऊ शकते; मात्र या जमिनीमधून प्रकल्पग्रस्तांची गरज भागत नव्हती. त्यामुळे धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांतील तीन हजार एकर ई-क्लास जमीन उपलब्ध होऊ शकते. त्यानुषंगाने  पुनर्वसित गावातील आदिवासी कुटुंबांना ई-क्लास जमीन वाटप करण्याची प्रक्रिया अकोला व अमरावती जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पुनर्वसित गावांमधील १00 कुटुंबांना तीन महिन्यात २00 एकर ई-क्लास जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे. यासंबंधी  अकोला व अमरावती जिल्हा प्रशासनामार्फत दोन्ही जिल्ह्यांतील संबंधित उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार व वन विभागाचे अधिकारी गुरुवारी पुनर्वसित गावांना भेट देऊन प्रकल्पग्रस्त आदिवासी कुटुंबांना लेखी देणार आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

पुनर्वसित गावातील प्रकल्पग्रस्त १00 कुटुंबांना तीन महिन्यांत २00 एकर ई-क्लास जमिनीचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी अकोला व अमरावती जिल्हा प्रशासनाच्यावतीने एसडीओ, तहसीलदार व वन विभागाचे अधिकारी गुरुवारी प्रकल्पग्रस्त आदिवासींना लेखी देणार आहेत.-आस्तिककुमार पाण्डेय,जिल्हाधिकारी 

टॅग्स :akotअकोटMelghatमेळघाट