शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh festival : गणरायांच्या स्वागतासाठी वाशिम जिल्हावासी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:55 IST

वाशिम : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायांची गुरूवार, १३ सप्टेंबर रोजी विधीवत स्थापना होणार असून गणरायांच्या स्वागतासाठी जिल्हावासी सज्ज झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायांची गुरूवार, १३ सप्टेंबर रोजी विधीवत स्थापना होणार असून गणरायांच्या स्वागतासाठी जिल्हावासी सज्ज झाले आहेत. यावर्षी १३ पोलीस स्टेशन परीक्षेत्रात एकूण ६९४ गणेश मंडळांकडून ‘बाप्पा’ची विधिवत स्थापना केली जाणार आहे.घरगुती गणरायांसोबतच सार्वजनिक गणेश मंडळे गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. वाशिम शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक शहरात गणरायांचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक मोठी पर्वणी असते. या उत्सवादरम्यान शांतता तसेच कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे पुरेशा प्रमाणात बंदोबस्त ठेवला जाणार आहे. याशिवाय दोन दंगा नियंत्रण पथक, एक अतिजलद प्रतिसाद पथक, चार चिडीमार विरोधी पथक, एक अँटी गुंडा पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली. या उत्सवासाठी सर्व तयारीनिशी सज्ज असल्याचा दावा पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनान केला. वाशिम शहरात रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर शहरातील गणेशभक्तांनी गणरायांच्या मुक्कामासाठी मंडप सजावटीची तयारी पूर्ण केली आहे. महागाईची झळ सोसून, गणेशभक्तांनी विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची ‘बुकिंग’ केलेली आहे. यावर्षी शहरी भागात २५२ आणि ग्रामीण भागात ४४२ असे एकूण ६९४ सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायांची स्थापना केली जाणार आहे. गणरायांच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हावासी सज्ज असून, बुधवारी वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथील बाजारपेठा गजबजलेल्या दिसून आल्या. विविध साहित्याच्या खरेदीसाठी भाविकांची एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.

टॅग्स :washimवाशिमGanpati Festivalगणेशोत्सव