शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

रेशनची चणा, उडीद डाळ दुकानांत पोहचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:17 IST

वाशिम : दिवाळीला रेशन दुकानांमधून चणा व उडीद डाळ देण्याच्या शासन निर्णयालाच प्रशासकीय यंत्रणेकडून ‘फटाके’ लावण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दिवाळीला रेशन दुकानांमधून चणा व उडीद डाळ देण्याच्या शासन निर्णयालाच प्रशासकीय यंत्रणेकडून ‘फटाके’ लावण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दिवाळी संपूनही अद्याप रेशन दुकानांत चणा, उडीद डाळ पोहचलीच नाही.गोरगरीब नागरिकांना रेशन दुकानाच्या माध्यमातून अत्यंत कमी किंमतीत धान्य उपलब्ध करून दिलेजाते. यामध्ये तांदूळ, गहू व साखर आदींचा समावेश आहे. गत काही महिन्यांपासून तूर डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. यावर्षीच्या दिवाळीत पहिल्यांदाच चणा व उडीद डाळ वितरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यासंदर्भात पुरवठा विभाग व संबंधित रेशन दुकानदारांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. पात्र शिधापत्रिकाधारकांची माहितीही मागविण्यात आली. त्या अनुषंगाने रेशन दुकानदारांनी चणा व उडीद डाळीच्या खरेदीसाठी १५ दिवसांपूर्वीच ‘चालान’ही भरले. मात्र, ऐन दिवाळीदरम्यानच चणा, उडीद डाळ रेशन दुकानांपर्यंत पोहचू शकली नाही. दिवाळीपूर्वी चणा व उडीद डाळ उपलब्ध होईल, आशेवर असलेल्या गोरगरीबांचा दिवाळीदरम्यान हिरमोड झाला. प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन कोलमडल्याचा फटका गोरगरीब लाभार्थींना बसला. असे होते डाळीचे परिमाणजिल्ह्यातील सर्व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड १ किलो चना डाळ, १ किलो उडीद डाळ याप्रमाणे वाटप परिमाण निश्चित केले होते. चना व उडीद डाळीचा किरकोळ विक्री दर ३५ रुपये प्रति किलो याप्रमाणे आहे.

चणा, उडीद डाळीसाठी १५ दिवसांपूर्वी चालान भरण्यात आले आहे. तीन  दिवसांपूर्वी चणा डाळ गोदामात आली आहे. आता सदर डाळ रेशन दुकानापर्यंत पोहचविण्यात येईल. उडीद डाळ अद्याप रेशन दुकानात आली नाही.- प्रभाकरराव काळे,जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, वाशिम

टॅग्स :washimवाशिम