अकोला : जिल्ह्यात अपात्र रेशनकार्डधारकांची शोधमोहीम लवकरच सुरू होणार असून, त्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या रेशनकार्डधारकांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत पात्र रेशनकार्डधारकांना दरमहा रास्तभाव दुकानांमधून धान्याचे वितरण वितरण करण्यात येते. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार अपात्र रेशनकार्डधारकांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या रेशनकार्डधारकांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात अपात्र रेशनकार्डधारकांची शोधमोहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत पत्राव्दारे सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४ लाख ३९ हजार ७६१ रेशनकार्ड आहेत. त्यामध्ये प्राधान्य गट (केशरी रेशनकार्डधारक) ३ लाख १ हजार ५२९ , अंत्योदय अन्न योजनेंतर्गत (पिवळे रेशनकार्डधारक) १ लाख १५ हजार ७१२ व पांढरे रेशनकार्डधारक २२ हजार ५०० इत्यादी रेशनकार्डधारकांचा समावेश आहे. अपात्र रेशनकार्ड शोधमोहिमेत रेशनकार्डधाकारकांचा उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, वीज देयक आदी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून, त्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या रेशनकार्डधारकांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे.
एकूण रेशनकार्डधारक
४,३९,७६१
केशरी रेशनकार्डधारक
३,०१,७१२
अंत्योदय रेशनकार्डधारक
१,१५,७१२
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
जिल्ह्यातील अपात्र रेशनकार्ड शोधमोहिमेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने सुरू केली आहे. त्यानुसार लवकरच ही समिती गठित होणार आहे.
...तर रेशनकार्ड रद्द
अपात्र रेशनकार्ड शोधमाेहिमेत रेशनकार्डधारकांचे आधार कार्ड, वीज बिल व उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असल्याचे आढळून आलेल्या रेशनकार्डधारकांचे रेशनकार्ड रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
हे पुरावे आवश्यक
रेशनकार्ड शोधमोहिमेत रेशनकार्डधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये रेशनकार्डधारकांनी एक लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड व वीज बिल इत्यादी पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात लवकरच अपात्र रेशनकार्डधारकांची शोधमोहीम सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमेत एक लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या रेशनकार्डधारकांचे रेशनकार्ड रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
-बी.यू.काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी