शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रास्त भाव दुकानदारांच्या नकारात अडकली पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:26 IST

पडताळणीचे काम करण्यास रास्त भाव दुकानदारांनी नकार दिल्याने, जिल्ह्यात शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांक पडताळणीचे काम अडकले आहे.

- संतोष येलकरअकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील गावा-गावांत रास्त भाव दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांकाची पडताळणी सुरू करण्यात आली; मात्र पडताळणीचे काम करण्यास रास्त भाव दुकानदारांनी नकार दिल्याने, जिल्ह्यात शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांक पडताळणीचे काम अडकले आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका क्रमांकाशी आधार क्रमांक संलग्नित (लिंक) असलेल्या शिधापत्रिकाधारकांना ‘ई-पॉस मशीन’द्वारे धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक शिधापत्रिका क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानंतर पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार शिधापत्रिकाधारक कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांकाची पडताळणी करण्याचे काम जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमध्ये गत पंधरा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते; परंतु रास्त भाव दुकानदारांकडून पडताळणीचे काम करण्यास रास्त भाव दुकानदार संघटनेच्यावतीने विरोध करण्यात आला असून, पडताळणीचे काम पुरवठा विभागामार्फत करण्याची भूमिका रास्त भाव दुकानदार संघटनेने घेतली आहे. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांमध्ये शिधापत्रिकाधाक कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि आधार क्रमांक पडताळणीचे काम ठप्प झाले आहे.जिल्ह्यात असे आहेत लाभार्थी शिधापत्रिकाधारक!-प्राधान्य गट : १४३५६०-अंत्योदय योजना : ३५६२७-एपीएल : ३३८८१.........................................................एकूण : २१३०६८जिल्ह्यात अशी आहेत रास्त भाव दुकाने!तालुका                              दुकानेअकोला शहर                      १२४अकोला ग्रामीण                  १७४अकोट                                 १६५बाळापूर                               ११४बार्शीटाकळी                         १२७मूर्तिजापूर                           १६३पातूर                                     ९४तेल्हारा                                  ९८...........................................एकूण                                 १०५९ 

शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांची ठसे आणि त्यांचे आधार क्रमांक पडताळणीचे काम पुरवठा विभागामार्फत करण्यात यावे, रास्त भाव दुकानदारांकडून पडताळणीचे काम करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटेचा विरोध आहे. त्यामुळे जिल्ह्यात रास्त भाव दुकानदारांकडून पडताळणीचे काम ठप्प आहे.-शत्रुघ्न मुंडे,जिल्हाध्यक्ष, सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना.

 

टॅग्स :Akolaअकोला