शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीबंद ज्युस व शीतपेयांमधील घटकांचे प्रमाण ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 18:38 IST

शीतपेय तयार करताना त्यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटकांचे प्रमाण आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणांतर्गत ठरवून देण्यात येणार.

अकोला: शीतपेय तयार करताना त्यात विविध घटकांचे प्रमाण किती असावे, या संदर्भात आतापर्यंत कुठलाच नियम नव्हता; परंतु यापुढे शीतपेय तयार करताना त्यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटकांचे प्रमाण आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणांतर्गत ठरवून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एफएसएसएआयच्या नवीन नियमावलीचे उल्लंघन केल्यास उत्पादकांवर कठोर कारवाईबाजारपेठेत विक्री होणाºया कुठल्याच शरबत, फळांचा रस तसेच इतर शीतपेयांमध्ये वापरण्यात येणाºया घटकांबद्दल आणि त्यांच्या प्रमाणाबद्दल कुठलेच नियम नव्हते. त्यामुळे उत्पादकांवर कुठलेच निर्बंधही नव्हते; परंतु आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पुढाकार घेत शीतपेय आणि ज्युस यामध्ये फळांचा रस आणि इतर घटकांचे प्रमाण किती असावे, याची नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, एफएसएसएआयच्या नवीन नियमानुसार फळांचा रस, पाणी, सॉलिड, सायट्रिक अ‍ॅसिड यांचे प्रमाण ठरवण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने फळांचा रस आणि अन्य घटक किती असावेत, याचे प्रमाण ठरवून दिले आहे. या संदर्भात प्राधिकरणाकडून नोटिफिकेशनदेखील काढण्यात आले आहे. त्यानुसार, तज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. या सूचनांचा विचार करून अंतिम मसुदा तयार केला जाणार आहे. त्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.असे असेल प्रमाणशीतपेयांमध्ये फळांच्या रसासोबतच सायट्रिक अ‍ॅसिड व इतर घटकांचा समावेश असतो. एफएसएसएआयच्या नवीन नियमानुसार, शीतपेयांमध्ये फळांच्या रसाचे प्रमाण २५ टक्के, तर सायट्रिक अ‍ॅसिडचे प्रमाण ३.५ टक्के असणे आवश्यक आहे. या शिवाय, इतर घटकांचे प्रमाण हे शीतपेयानुसार बदलण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने फळांचा रस आणि सायट्रिक अ‍ॅसिडचे प्रमाण सारखेच ठेवण्यात आले आहे.

या निर्णयामुळे आता शीतपेय तयार करताना उत्पादकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. उत्पादकांनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) द्वारे कारवाई केली जाईल.- नितीन ताथोड, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य