शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून महिला पत्रकारावर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 14:08 IST

अकोट: मुंबई गोरेगाव येथील २९ वर्षीय महिला पत्रकाराला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी संतोष शंकर मोरे याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते.

अकोट: मुंबई गोरेगाव येथील २९ वर्षीय महिला पत्रकाराला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी संतोष शंकर मोरे याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तो पसार झाला होता. त्याला अकोट येथून गोरेगाव पोलिसांनी शहर पोलिसांच्या मदतीने २७ डिसेंबर रोजी अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी २९ वर्षीय महिला पत्रकाराला अकोट येथील रहिवासी असलेला संतोष शंकर मोरे (३४) याने पहिले लग्न झालेले असतानाही ते लपवून ठेवत तिची इच्छा नसतानाही शरीरसंबंध ठेवले. तसेच सोबत राहिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून १८ सप्टेंबर २०१८ रोजी आरोपी संतोष मोरे याच्या विरुद्ध भादंवि ३७६ (२) एन, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपी संतोष मोरे हा मुंबईवरून अकोट येथील त्याच्या राहत्या घरी दडून बसला होता. याविषयी माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी अकोट गाठले. तसेच अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, हे.कॉ. संजय घायल, गुड्डू पठान, विजय सोळंके यांच्या सहकार्याने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. अकोट येथे आरोपी संतोष मोरे याला अटक करून न्यायालयात हजर करून आरोपी हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडून गोरेगाव पोलीस त्याला मुंबईला घेऊन गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची अकोट शहर पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार