Rape on girl; Father get regorious jail | मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास सश्रम कारावास
मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास सश्रम कारावास

अकोला - एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका १६ वर्षीय स्वत:च्या बालीकेवर अनैसर्गिक अत्याचार तसेच तीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापास प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीस तीन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेची तरतुद न्यायालयाने केली आहे. या आरोपीस पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने यापुर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ती शिक्षा तो भोगत आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी काशीराम तुळशिराम पानझडे याने त्याच्याच पोटच्या १६ वर्षीय बालीकेवर २८ आॅगस्ट २०१७ रोजी ही मुलगी झोपेत असतांना अनैसर्गिक अत्याचार केला, यासोबतच मुलीचा विनयभंग करीत अश्लील शिवीगाळ केली, झालेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे त स्वताच्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची खळबळजनक तसेच हृदयद्रावक घटना घडली होती. या मुलीला बालकल्याण समितीसमोर आणल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी काशीराम पानझाडे या नराधमाविरुध्द ३५४, ३५४अ, ३७७, ३२३, २९४, ५०६ आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ठाणेदार कीशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात केल्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलॅन्ड यांनी ७ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी नराधम काशीराम पानझाडेविरुध्द आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला विविध कलमान्वये शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील आरोपीस तब्बल ८ कलमांत शिक्षा ठोठावण्यात आली असून तीन लाख रुपये नुकसान भरपाई पिडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणामध्ये सरकारपक्षाकडून अ‍ॅड. मंगला पांडे व अ‍ॅड. राजेश आकोटकर यांनी कामकाज पाहिले.


Web Title: Rape on girl; Father get regorious jail
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.