कुरूम (अकोला): लग्न समारंभासाठी आलेल्या दिव्यांग २१ वर्षीय युवतीवर खोडद येथील २४ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना १४ जून रोजी रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी माना पोलिसांनी आरोपी आशीष गायकवाड या युवकाविरुद्ध १५ जून रोजी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. अमरावती जिल्ह्यातील काळगव्हान येथील २१ वर्षीय दिव्यांग युवती ही आपल्या आई,वडिलांसोबत बहिणीच्या लग्नाकरिता ग्राम खोडद येथे आजोळी आली होती. यावेळी सदर युवती ही १४ जून रोजी रात्री शौचालयाकरिता सुरेश इंगळे यांच्या शेतात जात होती. यावेळी खोडद येथील रहिवासी आरोपी आशिष अजाबराव गायकवाड याने त्या दिव्यांग मुलीस जबरदस्तीने तिचा हात धरून ओढत नेवुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडित युवतीच्या वडिलांच्या फियार्दीवरून पोलीस स्टेशन माना येथे आरोपी आशिष गायकवाड याच्या विरुद्ध भादंवी कलम ३७६ (२)(१),३२३ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी युवकास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास माना पो.स्टे. ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि.श्रीकृष्ण पाटील,हे.कॉ.बाळकृष्ण नलावडे,हे.कॉ. नंदकिशोर टिकार,पो.कॉ.रामेश्वर कथलकर,पो.कॉ.सचिन दुबे करीत आहे.
अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग तरुणीवर अकोल्यात अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:08 IST