शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

परतीच्या पावसाचा फटका; ज्वारीला फुटले कोंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 14:08 IST

ज्वारीचे पीक जमिनीवर असल्याने पावसामुळे ज्वारीच्या कणसांना कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.

- संतोष गव्हाळेहातरुण - खारपाणपट्टयातील शेतशिवारात ज्वारीचे उत्तम पीक शेतकर्‍यांना चार पैसे हाती देईल, अशी स्थिती असताना परतीच्या पावसाने ज्वारी काळी पडण्याच्या मार्गावर आहे. शेतात सोंगलेले ज्वारीचे पीक जमिनीवर असल्याने पावसामुळे ज्वारीच्या कणसांना कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.   पेरणी केल्यानंतर अधून-मधून या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव झाला. ढगाळ वातावरणामुळे ज्वारीचे पीक उत्तम प्रकारे येऊ शकले नाही. ज्वारीच्या कणसांची वाढ झाली मात्र, कणसे सुकण्याच्या मार्गावर असतांना पावसाने हजेरी लावली. शेतशिवारात ज्वारी चे काढणीची प्रक्रिया सुरू असतांना परतीच्या पावसामुळे कणसं पावसाच्या पाण्यामुळे भिजले. त्यामुळे कणसांणा कोंब फुटले आहेत. पांढरी शुभ्र येणारी ज्वारी ही काळसर स्वरूपाची तयार होण्याची शक्यता आहे. निमकर्दा, हातरुण, शिंगोली, मालवाडा, लोणाग्रा, हातला, मंडाळा, खांबोरा, बोरगाव, मांजरी, कंचनपूर, बादलापूर, अमानतपूर ताकोडा फाटा, अंदुरा शेतशिवारातील ज्वारी पीक अनेक ठिकाणी मातीत गेले आहे. कणसे काळी पडली आहेत. तसेच दाण्याला कोंब फुटले असून बुरशी आली आहे. परतीच्या पावसाची रिपरिप गेल्या तीन दिवसांपासून सुरू असल्याने सोगलेले सोयाबीन, ज्वारी कणसे भिजली असून पावसापासून पिकाचा बचाव करण्यासाठी गंजी वर ताडपत्री ने झाकून ठेवण्याची लगबग दिसून आली.  उडीद, सोयाबीन आणि ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सातत्याने मागील तीन ते चार वर्षांपासून सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली. मुंग, उडीद, सोयाबीन पिकाचा पेरणीपासून केलेला खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसामुळे थंडीसुद्धा वाढली आहे. पिके काढणीत असताना पाऊस झाल्यामुळे उत्पादन आणि दर्जावर परिणाम जाणवणार आहे. खरीप पिकांना सर्वाधिक झळ बसली आहे. परतीच्या पावसाने वेचणीचा कापूस भिजला आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेती कामांची लगबग कमी झाली.

निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला!   मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने खारपाणपट्टयातील शेतशिवारात जोरदार हजेरी लावली. सध्या शेतशिवारात उडीद, सोयाबीन, ज्वारी काढणी चे काम सुरू असून कापूस वेचणीला सुरूवात झाली आहे. पावसाची रिपरिप सुरु असल्याने काढणीच्या कामात !अडचण निर्माण झाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उडीद, सोयाबीन, ज्वारी पिकाला कोंब फुटले असून ज्वारी काळी पडली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.अवकाळी पावसाने उडीद, सोयाबीन आणि ज्वारीला कोंब फुटले आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी सारखा सण तोंडावर असतांना निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे.  - संजय घंगाळे, शेतकरी. 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी