शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

पाऊस आला; पण सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 2:11 PM

अकोला : सव्वा महिन्याच्या दीर्घ खंडानंतर पाऊस आला; पण मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकांचे २० टक्के नुकसान झाले असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. काळ्या भारी जमिनीतील पिके मात्र या पावसाने तरली आहेत.विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ९० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत; पण नागपूर विभाग पीछाडीवर आहे. या विभागात ७१ टक्केच पेरण्या झाल्या ...

ठळक मुद्देपावसाने दडी मारल्याने मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकाने मान टाकली होती. पाऊस उशिराने आल्याने किडींना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढला आहे.

अकोला : सव्वा महिन्याच्या दीर्घ खंडानंतर पाऊस आला; पण मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकांचे २० टक्के नुकसान झाले असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. काळ्या भारी जमिनीतील पिके मात्र या पावसाने तरली आहेत.विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ९० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत; पण नागपूर विभाग पीछाडीवर आहे. या विभागात ७१ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. या विभागात सर्वात जास्त सहा लाखांवर धानाचे क्षेत्र आहे; पण सव्वा महिना पावसाने दीर्घ दडी मारल्याने भाताची (धान) चिखलणी व रोवणी रखडली होती; पण आता दमदार पाऊस झाल्याने धान पिकांच्या चिखलणी, रोवणीस सुरुवात होईल. उत्पादनावर काही अंशी परिणाम होण्याची शक्यता आहे. अमरावती विभागात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक १४ लाख हेक्टरवर झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकाने मान टाकली होती. बहुतांश भागात हे पीक करपले होते, तसेच ज्या ठिकाणी सोयाबीन फुलावर होते, त्यावेळी पाऊस न आल्याने अशा ठिकाणचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या तूर पीकही उत्तम आहे. पाऊस उशिराने आल्याने किडींना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढला आहे.

- विदर्भात पावसाने दडी मारल्याने मुरमाड जमिनीतील पिकांवर अल्पसा परिणाम झाला होता. जेथे सोयाबीन फुलांच्या अवस्थेत होते, तेथे त्यावेळी पाणी न मिळाल्याने तेथे सोयबीनचे २० टक्केपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता आहे. आता तीन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने पूर्व विदर्भातील धान पिकाला संजीवनी मिळाली आहे.डॉ. मोहन खाकरे,कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी