शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

उड्डाणपुलाचे रेल्वे हद्दीतील कामही 'पीडब्ल्यूडी' करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:32 IST

अकोला: स्थानिक न्यू तापडिया नगराच्या उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील बांधकामदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे.

अकोला: स्थानिक न्यू तापडिया नगराच्या उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील बांधकामदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यामुळे या रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम येत्या दोन वर्षाच्या आत पूर्ण होण्याचे संकेत आहे.सातव चौकापासून न्यू तापडिया नगरापर्यंतच्या रेल्वे ओव्हर ब्रीज उभारणीचे काम सुरू झाले आहे. न्यू तापडिया नगरच्या बाजूने कंत्राट कंपनीने प्लॅन्ट टाकला आहे. न्यू तापडिया नगर आणि सातव चौकाकडून हे काम सुरू होत असले तरी अद्याप रेल्वे विभागाने त्यांच्या हद्दीतील कामास परवानगी दिलेली नाही. रेल्वेच्या परवानगी आणि त्यांच्या स्वतंत्र कामकाजाच्या यंत्रणेमुळे अकोल्यातील आधीच डाबकी आरओबीचे बांधकाम रखडलेले आहे. ही स्थिती न्यू तापडिया नगरच्या आरओबीची होऊ नये यासाठी अकोलासार्वजनिक बांधकाम विभागाने आधीच पत्रव्यवहार सुरू केला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने न्यू तापडिया नगरच्या रेल्वे हद्दीतील बांधकामही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविले आहे; मात्र या संपूर्ण कामाची देखरेख ही रेल्वे अधिकारी आणि त्यांच्या तज्ज्ञ अभियंत्याकडे राहणार आहे. वास्तविक पाहता, रेल्वे हद्दीतील प्रत्येक बांधकाम रेल्वे प्रशासनाद्वारे केले जाते; मात्र हे पहिले काम आहे की, रेल्वे प्रशासनाने ही जबाबदारी सा.बां.कडे सोपविली आहे. हाती घेतलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागावे म्हणून हे काम रेल्वे प्रशासनाने राज्याकडे सोपविले आहे. जवळपास १५५ मीटरच्या व्यासाचा हा उड्डाण पूल मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे लाइनच्या वरून जाणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांच्या आत न्यू तापडिया नगराच्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. डाबकी आरओबीचे बांधकाम तब्बल दोन वर्षांपासून रखडल्यामुळे त्रस्त झालेल्या अकोलेकरांची स्थिती पाहता, न्यू तापडिया नगराच्या आरओबीचे काम लवकर पूर्ण होण्याचे संकेत आहे. अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता हेमंत राठोड, उपअभियंता महेश देशमुख आणि सहायक गणवीर कामकाज पाहत आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभागrailwayरेल्वे