दहशतवादी विरोधी कक्षाचे पथकप्रमुख विलास रमेश पाटील पथकासह उरळ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्यासाठी गस्त घालत असताना मोरगाव (सादिजन) येथील अंजना सोळुंके तिच्या राहत्या घरी गावठी दारू अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली. यावरून दहशतवादविरोधी पथकाने गावठी हात भट्टीवर छापा टाकून अंजना अरुण सोळंके (वय ५०, रा. मोरगाव (सादिजन) हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून ७५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, ४५ लिटर मोहामाच सळवा, गावठी दारू, गाळणी साहित्य असा एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिला आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन, उरळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादीविरोधी कक्ष, अकोलाचे प्रमुख विलास रमेश पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.
मोरगाव येथील गावठी दारू अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST