अकोला : मंगळवारी रात्री २ वाजता गस्तीवर असताना खदानचे पीएसआय टिकाराम थाटकर यांनी मलकापूर येथे छापा घालून जुगार खेळणारे केशवनगरातील सचिन प्रल्हाद धोत्रे (२९), गुरुकुलनगरीतील महेंद्र गजानन केंद्रे, मलकापुरातील नितीन श्रीकृष्ण देवलाले (३0), संतोष सूर्यभान कोरपे (३२) यांना अटक केली. त्यांच्याकडून बावनतास पत्ते, रोख ५४३0 रुपये जप्त केले. आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.
जुगारावर छापा, चौघांना अटक
By admin | Updated: October 2, 2014 01:50 IST