शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

वाशिम जिल्ह्यात आॅक्टोबर अखेर ६.५ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 13:27 IST

वाशिम: रब्बीच्या पेरणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असली तरी, आॅक्टोबर अखेर केवळ ६४८४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रब्बीच्या पेरणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असली तरी, आॅक्टोबर अखेर केवळ ६४८४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. भारनियमनामुळे शेतकºयांना सिंचन करणे कठीण होत असल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात सरासरी ९२९९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होते. त्यात यंदा पाऊस समाधानकारक झाला. त्यामुळे जलस्त्रोतात पुरेसा साठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रात थोडीबहुत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु ऐन रब्बीच्या तोंडावर भारनियमन सुरू करण्यात आले. त्यामुळे वीज पुरवठ्याअभावी शेतकºयांना पेरणीसाठी जमीन ओली करणेही कठीण झाले. याच कारणामुळे आॅक्टोबर महिना संपत आला तरी, जिल्ह्यात केवळ ६४८४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यातही गहू पिकाला पाण्याची अधिक गरज असते. त्यामुळे शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरवत हरभरा पेरणीवर भर दिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सरासरी २८ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थिती केवळ ४३७ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. अर्थात अद्याप गव्हाच्या पेरणीसाठी आणखी बराच कालावधी आहे; परंतु पुढेही भारनियमन आणि वातावरणातील बदलामुळे सरासरी क्षेत्राच्या ५० टक्के पेरणीही होण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात ६२ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावर हरभºयाची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत केवळ ६०१९ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. तृणधान्य, गळीताकडे शेतकºयांची पाठजिल्ह्यात रब्बी ज्वारी, मका आदि पिकांसह इतर तृणधान्याची सरासरी १ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत असताना अद्याप एकाही हेक्टरवर तृणधान्याची पेरणी झाली आहे. त्यातच जिल्ह्यात रब्बी गळीताचे क्षेत्र ४१४ हेक्टर अपेक्षीत असताना केवळ २६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. यावरून शेतकºयांनी तृणधान्य आणि गळीताकडेही पाठ केल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती