शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांच्या ‘लॅपटॉप’चा प्रश्न अडकला लालफितशाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:35 IST

जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर देण्याचा निर्णय १६ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, १ फेब्रुवारीपूर्वी वित्त विभागाची मान्यता न घेतल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला असून प्रशासनही हतबल झाले आहे.

- सुनील काकडे    वाशिम : केंद्र शासनाच्या ‘डिजीटल इंडिया लॅण्ड रेकॉर्ड मॉर्डननायजेशन प्रोग्राम’अंतर्गत ७/१२ दस्तावेज बिनचूक करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी संगणकीकरण प्रक्रिया अधिक गतीमान होणे आवश्यक असल्याने ८० लाख रुपये उपलब्ध करून जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटर देण्याचा निर्णय १६ जानेवारीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, १ फेब्रुवारीपूर्वी वित्त विभागाची मान्यता न घेतल्याने हा प्रश्न लालफितशाहीत अडकला असून प्रशासनही हतबल झाले आहे.७/१२ दस्तावेज संगणकीकरण व डिजिटल ७/१२ दुरुस्त (री-एडीट) करण्याची प्रक्रिया गतिमान करणे, दुरुस्त झालेला ७/१२ संबंधित तलाठ्याच्या डिजिटल स्वाक्षरीसह ‘आॅनलाइन’ स्वरुपात उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून मंदावली आहे. त्यास गती देण्यासाठी १६ जानेवारीला पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८० लाखांची तरतूद करून जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यास वित्त विभागाकडून मान्यता घेण्यात प्रशासकीय दिरंगाई झाली. अशातच १ फेब्रुवारीपूर्वी कुठल्याही खर्चीक बाबीस वित्त विभागाची मान्यता घेतली नसल्यास तो खर्च मान्य केला जाणार नसल्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले. त्यात तलाठ्यांचे लॅपटॉप व प्रिंटरचाही समावेश असल्याने ही बाब आता लांबणीवर पडली आहे. यामुळे मात्र ‘लॅपटॉप’अभावी दुरुस्त व अचूक ७/१२ संबंधित तलाठ्याच्या स्वाक्षरीने आपले सरकार पोर्टल, महाभूलेख पोर्टलवर अपलोड करणे अशक्य झाले असून शेतकऱ्यांनाही हा दस्तावेज मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना निधीतून ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, १ फेब्रुवारीपूर्वीच्या बाबी वगळता त्यानंतर वित्त विभागाच्या मान्यतेशिवाय कुठलाही खर्च करू नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे तलाठ्यांच्या लॅपटॉप व प्रिंटर खरेदीसाठी होणाºया खर्चास प्रशासकीय मान्यता मिळण्याकरिता वित्त विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमlaptopलॅपटॉपRevenue Departmentमहसूल विभाग