अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांमध्ये मानधनावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)च्या स्वतंत्र खात्याचा प्रश्न अखेर ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मार्गी लागला. जिल्हास्तरावर स्वतंत्र खाते नसल्यामुळे गत वर्षभरापासून तब्बल २५२ कर्मचाºयांच्या मानधनातून कपात झालेली ‘ईपीएफ’ ची रक्कम या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली नव्हती.‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशीत करताच जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कामास लागला असून, ही रक्कम जमा होण्यात अडचण ठरलेल्या पॅनकार्डमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर कर्मचाºयांच्या खात्यात ईपीएफची रक्कम वळती होणार आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या तसेच १५ हजार रुपयांपर्यंत मानधन घेणाºया राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाºयांना १ एप्रिल २०१५ पासून ईपीएफ सुविधा लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एनएचएम अंतर्गत ४५० अधिकारी/कर्मचारी कार्यरत असले, तरी १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधन घेणाºयांची संख्या २५२ एवढी आहे. गत वर्षभरापासून या कर्मचाºयांच्या मानधनातून १२ टक्के कर्मचारी हिस्सा म्हणून कापण्यात येत आहे. परंतु, जिल्हास्तरावर स्वतंत्र खाते नसल्यामुळे या कर्मचाºयांच्या ईपीएफ खात्यांमध्ये ही रक्कम जमा झाली नाही. जिल्हास्तरावर खाते उघडण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा लेखा व्यवस्थापक यांच्याकडे असतानाही त्या दिशेने कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.पॅनकार्ड व खात्यातील नाव जुळत नसल्याने झाला घोळएनएचएम कर्मचाºयांच्या ईपीएफ साठी आयसीआयसीआय बँकेत ‘डिस्ट्रिक इंटिग्रेटेड फॅमिली वेलफेअर सोसायटी’ या नावाने खाते आहे. या खात्याचे पॅनकार्ड आणि बँकेत असलेल्या खात्याच्या नावात साधर्म्य नसल्याने गत वर्षभरापासून कर्मचाºयांची रक्कम खात्यात जमा होण्यात अडचण निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत करताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांनी त्याची दखल घेऊन आयसीआयसी बँकेकडून माहिती घेतली. पॅनकार्ड व खात्याच्या नावातील घोळ लक्षात आल्यानंतर आता पॅनकार्डमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. ही दुरुस्ती झाल्यानंतर पॅनकार्ड लिंक होऊन कर्मचाऱ्यांच्या ईपीएफची रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे.जिल्हा लेखा व्यवस्थापकास कारणे दाखवागतवर्षभरापासून कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ रकमेचा घोळ सुरु असतानाही त्या दिशेने कार्यवाही न करणाºया जिल्हा लेखा व्यवस्थापक दिपक मालखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांच्या ‘ईपीएफ’ खात्याचा प्रश्न मार्गी
By atul.jaiswal | Updated: December 30, 2017 15:44 IST
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांमध्ये मानधनावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ)च्या स्वतंत्र खात्याचा प्रश्न अखेर ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मार्गी लागला.
अकोला जिल्ह्यातील २५२ ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांच्या ‘ईपीएफ’ खात्याचा प्रश्न मार्गी
ठळक मुद्देवर्षभरापासून तब्बल २५२ कर्मचाऱ्यांच्या मानधनातून कपात झालेली ‘ईपीएफ’ ची रक्कम खात्यात जमा झाली नव्हती.‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशीत करताच जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कामास लागला.रक्कम जमा होण्यात अडचण ठरलेल्या पॅनकार्डमध्ये दुरुस्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात ईपीएफची रक्कम वळती होणार आहे.