शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी गायरानात मातीचे अवास्तव उत्खनन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 02:39 IST

पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या  रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात ३0 ते ३५ फूट खोल  मातीचे उत्खनन करण्या त येत आहे. निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत  असल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप येणार असून, त्यामुळे परिसरातील  ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशिलोडा-कानडी परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येणार?

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या  रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात ३0 ते ३५ फूट खोल  मातीचे उत्खनन करण्या त येत आहे. निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत  असल्याने, या भागाला तलावाचे स्वरूप येणार असून, त्यामुळे परिसरातील  ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.पूर्णा -खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या  रुंदीकरणाच्या कामासाठी शिलोडा-कानडी रस्त्यालगत गट नं. ३८  व ३९  मधील सरकारी जमिनीवर (गायरान) मातीचे उत्खनन करण्यात येत आहे.  पुणे येथील दीपक नारायण करंगळ यांच्या राइट इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीमार्फत  ५00 मीटर लांबीच्या भागात ‘जेसीबी’द्वारे मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. गायरान जमिनीवरील माती उत्खननाची परवानगी संबंधित कंपनीमार्फत तीन  महिन्यांपूर्वी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली.  अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रशासनामार्फत गायनरान जमिनीवरील माती उ त्खननाची परवानगी देण्यात आली असून, उत्खननाच्या निकषानुसार २0 फूट  खोल मातीचे उत्खनन करण्याची र्मयादा आहे. परंतु, प्रत्यक्षात गायरान  जमिनीवरील ३0 ते ३५ फूट खोल मातीचे उत्खनन करण्यात येत असल्याचे  वास्तव आहे. सरकारी जमिनीवरील मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याने  शिलोडा-कानडी रस्त्यालगत असलेल्या या भागाला पावसाळ्यात मोठय़ा  तलावाचे स्वरूप येणार आहे. मोठय़ा प्रमाणात खोल मातीचे उत्खनन करण्यात  येत असल्याने, या भागात पावसाचे पाणी साचल्यास अपघाताचे प्रसंग  घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांसह जनावरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता  आहे.

अटी व शर्तींचाही भंग!गायरानातील माती उत्खननासंबंधी देण्यात आलेल्या परवान्यातील अटी व श र्तींचाही भंग होत आहे. उत्खननासाठी देण्यात येणार्‍या परवान्यातील अटी व श र्तीनुसार सूर्यास्तानंतर मातीचे उत्खनन व वाहतूक करता येत नाही. तसेच २0  फुटापेक्षा जास्त खोल मातीचे उत्खनन करता येत नाही. परंतु शिलोडा शिवारात  गायरान जमिनीवर रात्रंदिवस मातीचे उत्खनन सुरू असून, २0 फुटापेक्षा जास्त  ३0 ते ३५ फुटापर्यंत खोल मातीचे उत्खनन करण्यात येत असल्याचे या भागा तील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

शिलोडा-कानडी रस्त्यालगत गायरान जमिनीवर मोठय़ा प्रमाणात मातीचे उ त्खनन करण्यात येत आहे. ३0 ते ३५ फुटापर्यंत खोल मातीचे उत्खनन  करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात पावसाचे पाणी साचणार  असल्याने, नागरिकांसह जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.  त्यामुळे उत्खनन करण्यात आलेल्या या भागात तारेचे कुंपण घेण्याची मागणी  आम्ही संबंधित कंपनीकडे करण्यात आली; मात्र तारेचे कुंपण न करता मा तीचा भराव टाकण्यात येणार असल्याचे उत्खनन करणार्‍या कंपनीच्या व्यवस् थापकांकडून सांगण्यात आले.-सुनील सरोदे, नागरिक, शिलोडा.

निकषाप्रमाणे मातीचे उत्खनन २0 फुटापर्यंंत करता येते. अटी व शर्तींच्या  अधीन राहून शिलोडा शिवारात मातीचे उत्खनन करण्यास परवानगी देण्यात  आली आहे. ‘रॉयल्टी’च्या तुलनेत मातीचे उत्खनन करण्यात आले की नाही,  तसेच निकषानुसार मातीचे उत्खनन झाले की नाही, याबाबत चौकशी करण्यात  येणार आहे.- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरRailway Passengerरेल्वे प्रवासी