ठळक मुद्देशेतकरी अनभिज्ञ आज मोजणी करण्यात येणार होतीएक दिवस अगोदर नोटीस

ऑनलाईन लोकमत


जळगाव, दि. 13 -  जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी रेल्वेचे प्रतिनिधी, भूसंपादन अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन आमच्याशी चर्चा करा, अशी मागणी नशिराबाद येथील शेतक:यांनी केली. यामुळे 13 पासून सुरू होणारी जमिनींची मोजणी अधिकारीवर्ग तेथे जाऊनही होऊ शकली नाही. 
जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गासाठी नशिराबाद येथील गट क्रमांक 235, 234, 226, 225,224, 779, 776, 769, 768, 751, 746, 744, 743 मध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यानुसार याची 13 सप्टेंबरपासून कार्यवाही सुरू करण्यात येऊन आज मोजणी करण्यात येणार होती. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षकांनी मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील उप मुख्य अभियंत्यांना (निर्माण) पत्र देऊन रेल्वेचे प्रतिनिधी, 5 मजूर व आवश्यक साहित्य घेऊन सकाळी 8 वाजता हजर राहण्याबाबत कळविले होते. 
त्यानुसार भूमीअभिलेख कार्यालयाचे भूकर मापक (सव्रेअर) संदीप हिरोळे व रेल्वेचे प्रतिनिधी नशिराबाद येथे पोहचले. मात्र याबाबत शेतक:यांना कोणतीही माहिती नसल्याने या प्रकल्पाचा उद्देश व इतर माहिती मिळण्यासाठी भूसंपादन अधिकारी, रेल्वे प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्यात यावी, अशी मागणी शेतक:यांनी केली. त्यानुसार शेतक:यांकडून अधिका:यांनी पंचनामा लिहून घेतला. हा अहवाल भूमीअभिलेक कार्यालयाच्या वरिष्ट अधिका:यांना पाठविण्यात येणार असल्याचे संदीप हिरोळे यांनी सांगितले.

शेतक:यांची जमीन संपादीत करण्यात येत असली तरी त्याबाबत शेतक:यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे शेतक:यांचे म्हणणे आहे. 12 रोजी एका व्यक्तीकडे नोटीस देण्यात आल्या व लगेच 13 पासून मोजणी करण्यास सुरू करणे म्हणजे शेतक:यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा शेतक:यांनी आरोप केला. 

विरोध नाही, मात्र चर्चा करा
या ठिकाणी होणारा प्रकल्प, विकासाला आमचा विरोध नाही, मात्र या बाबत सार्वत्रिक चर्चा होऊन माहिती मिळणे गरजेचे असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. या बाबत शेतक:यांनी बुधवारी संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन अधिका:यांची भेटही घेतली व आपली हरकत नोंदविली. 

या प्रकल्पाला शेतक:यांचा विरोध नाही, मात्र या बाबत त्यांना माहिती मिळणे गरजेचे आहे. एक दिवस अगोदर नोटीस काढणे व लगेच मोजणी करणे गैर आहे. याबाबत संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्याची मागणी आहे.
- लालचंद पाटील, जि.प. सदस्य, नशिराबाद

नशिराबाद येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी गेल्यानंतर शेतक:यांनी संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांच्याकडून पंचनामा लिहून घेतला. तो वरिष्टांकडे पाठविण्यात येईल. 
- संदीप हिरोळे, भूकर मापक, भूमी अभिलेख कार्यालय