शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इलाजाच्या नावाखाली पैसे उकळून फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा अकोल्यात पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 13:41 IST

अकोला : आक्षेपार्ह जाहिराती देऊन इलाजाच्या नावाखाली पैसे उकळून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील हरिद्वार येथील पंडित ओमप्रकाश जोशी या भोंदूवर रविवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देभोंदू ज्योतिषी हा वंध्यत्व, मतिमंदत्व, कँसर यासारख्या गंभीर शारीरिक व मानसिक आजारांवर मोठी रक्कम उकळून इलाज करण्याच्या नावाने फसवणूक करायचा. पंडित ओमप्रकाश जोशी या भोंदूवर रविवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

अकोला : आक्षेपार्ह जाहिराती देऊन इलाजाच्या नावाखाली पैसे उकळून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील हरिद्वार येथील पंडित ओमप्रकाश जोशी या भोंदूवर रविवारी सिव्हिल लाइन पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.भोंदू ज्योतिषी हा वंध्यत्व, मतिमंदत्व, कँसर यासारख्या गंभीर शारीरिक व मानसिक आजारांवर मोठी रक्कम उकळून इलाज करण्याच्या नावाने फसवणूक करायचा. आजारांवर इलाज करण्याचा दावा करणे, जाहिरात करणे किंवा त्याचा प्रचार-प्रसार करणे हाच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा ठरतो. हा भोंदू ज्योतिषी मागील अनेक वर्षांपासून नागरिकांची फसवणूक करीत होता. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच महानगर संघटक चंद्रकांत झटाले, युवा संघटक अ‍ॅड. अनिल लव्हाळे, अ‍ॅड. शेषराव गव्हाळे, हरीश आवारे, महिला संघटिका संध्या देशमुख यांनी त्या भोंदू ज्योतिषाची पोलिसांत तक्रार करीत भोंदूगिरीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

ज्या ज्योतिषाला आपल्यावर उद्या पोलिसांत गुन्हे दाखल होणार, याची माहिती नाही, त्याच्यावर नागरिकांनी कितपत विश्वास ठेवावा, कुठेही अशा प्रकारची नागरिकांची फसवणूक होत असेल, तर नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा.-चंद्रकांत झटाले, महानगर संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा