शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सम्यक विद्यार्थी आंदोलनने अकोल्यात जाळला  पुणे विद्यापिठाचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 18:45 IST

अकोला : पुणे विद्यापिठाकडून दिल्या जाणाºया शेलारमामा पुरस्कारासाठी अर्ज सादर करणारा विद्यार्थी इतरही काही अटींसोबत तो शाकाहारी असावा, अशी अट टाकण्यात आली आहे. हा प्रकार प्रकार म्हणजे, शाकाहारी नसलेल्या विद्यार्थ्यांना कमी लेखण्यासारखा आहे. त्याचा निषेध करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन अमरावती विभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर पुणे विद्यापिठाचा पुतळा प्रतिकात्मक जाळण्यात आला.

ठळक मुद्देपुरस्कारासाठी विद्यापिठाला विद्यार्थी शाकाहारीच हवेत

- सदानंद सिरसाटअकोला : पुणे विद्यापिठाकडून दिल्या जाणाºया शेलारमामा पुरस्कारासाठी अर्ज सादर करणारा विद्यार्थी इतरही काही अटींसोबत तो शाकाहारी असावा, अशी अट टाकण्यात आली आहे. हा प्रकार प्रकार म्हणजे, शाकाहारी नसलेल्या विद्यार्थ्यांना कमी लेखण्यासारखा आहे. त्याचा निषेध करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन अमरावती विभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर पुणे विद्यापिठाचा पुतळा प्रतिकात्मक जाळण्यात आला.पुणे विद्यापिठाकडून शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये विज्ञान शाखेव्यतिरिक्त पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थी शाकाहारी असावा ही चुकीची अट लावण्यात आली. तसेच विशिष्ट संस्कृतीचा हा धार्मिक असावा, हे दडपण टाकण्यासाठी पुरस्काराच्या आवाहनात अटी टाकण्यात आल्या. त्यातच विद्यार्थी भारतीय संस्कृती, आचार, विचार, परंपरा मानणारा व स्वताच्या जीवनात आचरण करणारा असावा, असेही म्हटले आहे. हा प्रकार म्हणजे, इतर परंपरा, धर्म, संस्कृतीला मानणाºया विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिला जाणार नाही का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांवर विशिष्ट संस्कृती व धार्मिक संस्कृतीचे दडपण टाकण्यात आले आहे. विद्यापिठाच्या या एकांगीपणाचा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने निषेध केला. त्यासाठी विद्यापिठाचा प्रतिकात्मक पुतळा राष्ट्रीय महामार्गावर जाळण्यात आला. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख सचिन शिराळे, अमरावती विभागाचे अध्यक्ष नितेश कीर्तक,जिल्हा अध्यक्ष अमोल समाधान सिरसाट, राजकुमार दामोदर, अविनाश भगत, डॉ. मनिष खंडारे, योगेश कीर्तक, प्रेमकुमार वानखडे, निकी डोंगरे, रितेश कीर्तक, सुमेध आ. वानखडे, आनंद वानखडे, भुषण पातोडे, सोहन दांडगे, धीरज पांडे,विकेश जगताप, रोहन वानखडे, रवी दामोदर उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलन