शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळू घाटांच्या लिलावासाठी ‘अ‍ॅप’द्वारे होणार जनसुनावणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 10:02 IST

प्रत्येक जिल्ह्यात ‘अ‍ॅप’द्वारे जनसुनावणी घेण्यात येणार असून, ई-मेलद्वारे नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लागू असलेल्या ‘लॉकडाउन’ परिस्थितीत वाळू घाटांच्या लिलावासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘अ‍ॅप’द्वारे जनसुनावणी घेण्यात येणार असून, ई-मेलद्वारे नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत. राज्यातील नवीन वाळू धोरण ३ सप्टेंबर २०१९ रोजी निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार वाळू घाटांच्या लिलावाचे नियोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खनिकर्म विभागामार्फत करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत वाळू घाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी घेणे शक्य नसल्याची बाब काही जिल्ह्यांनी शासनास अवगत केली होती. त्यानुषंगाने शासनामार्फत २७ एप्रिल रोजी पत्राद्वारे दिलेल्या निर्देशानुसार वाळू घाटांच्या लिलावाचे प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्याकरिता जनसुनावणी घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि ‘लॉकडाउन’ लागू असल्याने ’फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत वाळू घाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी घेण्याकरिता ‘अ‍ॅप’ किंवा यासारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करून , ई-मेलद्वारे सूचना व हरकती मागवून जनसुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत.त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलावासाठी ‘अ‍ॅप’ द्वारे जनसुनावणी घेण्यात येणार असून, त्यामध्ये ई-मेलद्वारे नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार आहेत.शासनाच्या निर्देशानुसार कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि ‘लॉकडाउन’च्या परिस्थितीत वाळू घाटांचा लिलावासाठी ‘अ‍ॅप’ द्वारे जनसुनावणी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.- डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग