....................
विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारी अकाेल्यात
अकाेला : माजी मुख्यमंत्री व विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवार १६ मे राेजी अकाेल्यात येत आहेत. ते काेविड उपाययाेजनांचा आढावा घेणार आहेत. यावेळी सर्वाेपचार रुग्णालयातही ते पाहणी करतील अशी माहिती भाजपचे प्रवक्ते गिरीश जाेशी यांनी दिली.
...................................
काेविडमुळे निराधार झालेल्यांना मदत द्या
अकोला : काेराेनामुळे निराधार झालेल्या महिला व मुलांना मध्य प्रदेशच्या धर्तीवर आधार देण्याची मागणी भाजपने केली आहे. विधवा निराधार महिलांना पाच हजार रुपये व त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षण शिक्षणाची हमी शासनाने घ्यावी अशी मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, महापौर अर्चनाताई मसने, तेजराव थोरात, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली आहे.
..........................
पॅरामेडिकल विद्यार्थी मानधनापासून वंचित
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकलचे विद्यार्थी आपल्या शैक्षणिक वर्षात अभ्यासाबरोबरच कोरोनाच्या काळात सेवा देत आहे. त्याकरिता त्यांना शिक्षणाचा एक भाग म्हणून बंधनकारक केले जाते. परंतु शासनाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा व त्यापासून वंचित ठेवले जाते. त्यांना काेराेनासेवेचे मानधन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या विदर्भ महिला अध्यक्षा सुवर्णा खोडकुंभे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
..........................
पथदिवे सुरू करा
अकाेला : प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या नायगाव परिसरातील वस्त्यांमध्ये अद्यापही महापालिका प्रशासनाने पथदिव्यांसाठी विद्युत खांब उभारले नाहीत. यामुळे परिसरातील रहिवाशांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत असून ही समस्या दुर करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केली आहे.
..........................
ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण
अकाेला : शहरात ले-आऊटचे निर्माण करताना त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ओपन स्पेस ठेवणे भाग आहे. बहुतांश ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण झाल्यामुळे लहान मुलांची कुचंबणा हाेत आहे. वयोवृध्द नागरिक, लहान मुलांसाठी अशा खुल्या जागा विकसित करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे.
..........................
किल्ल्याची दुरवस्था; मनपाचे दुर्लक्ष
अकाेला : शहरात इतिहासाची एकमेव साक्ष देणाऱ्या जुने शहरातील असदगड किल्ल्याची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गतवर्षी किल्ल्याची पडझड थांबावी या उद्देशातून संरक्षक भिंत उभारण्यात आली हाेती. किल्ल्याच्या ठिकाणी साैंदर्यीकरणाला माेठा वाव आहे.
.............
'दररोज पाणीपुरवठा करावा' !
अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे. परंतु दैनंदिन पाणीपुरवठा हाेत नसल्याने अकाेलेकरांमध्ये नाराजी आहे. मनपाने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रभाग-१मधील नायगाव येथील रहिवाशांनी केली आहे.