शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जातवैधताप्रकरणी कारवाईतून संरक्षणप्राप्त कर्मचारी सुटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 16:46 IST

उच्च न्यायालयातून संरक्षण प्राप्त कर्मचाऱ्यांनी त्याबाबतचा आदेश आस्थापनांकडे सादर करणे सुरू केले आहे.

अकोला : अनुसूचित जमातींची जातवैधता नसलेल्यांच्या सेवा समाप्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी त्यापूर्वी उच्च न्यायालयांनी संरक्षण दिलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील संरक्षण प्राप्त कर्मचारी त्यातून वगळले जात आहेत. उच्च न्यायालयातून संरक्षण प्राप्त कर्मचाऱ्यांनी त्याबाबतचा आदेश आस्थापनांकडे सादर करणे सुरू केले आहे.बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करून नोकरी आणि शैक्षणिक पदवी मिळविणाºयांच्या अधिकारी-कर्मचाºयांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शिक्षणासाठी तसेच नोकरी मिळविताना बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाºयाला नोकरी आणि पदवी दोन्ही गमावावी लागणार आहे, तसेच संबंधितांना शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांवर नोकरी प्राप्त करणाºयांची जातवैधता प्राप्त करून घेणे, त्याची सत्यता पडताळणी तातडीने करण्याचा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २३ डिसेंबर २०१९ रोजी दिला होता. शासकीय सेवेत राखीव जागेवर नियुक्ती प्राप्त झालेले तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत दस्तऐवज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले. या समितीकडून जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर सर्वच संवर्गात अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांवर नियुक्त अधिकारी-कर्मचाºयांची माहिती गोळा करणे सुरू झाले. त्यांच्याकडून नियुक्तीबाबतची संपूर्ण कागदपत्रे, जातवैधता प्रमाणपत्रेही घेतली जात आहेत. ठरलेल्या मुदतीत ही कागदपत्रे प्राप्त न झाल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाºयांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य शासनाचे १५ जून १९९५, जून २००२ यांसह कर्मचाºयांना संरक्षण देणारे सर्व शासन निर्णय रद्द झाले. त्या आदेशामुळे संरक्षण प्राप्त कर्मचारी कारवाईच्या कचाट्यात अडकले. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातच यापूर्वी उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात ज्या कर्मचाºयांना संरक्षण देण्यात आले, त्यांना वगळण्याचे म्हटले आहे. त्यामुळे जातवैधतेप्रकरणी न्यायालयातून संरक्षण मिळालेल्या कर्मचाºयांवर कारवाई करता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनातील आस्थापनांकडून सांगितले जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय