अकोला : धनादेश अनादरप्रकरणी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी गजाला अलअमोडी यांच्या न्यायालयाने मंगळवारी आरोपीस एका महिन्याचा कारावास व ३0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मुकेश नानकराम जीवतरामानी यांचा एमआयडीसीमध्ये अगरबत्ती निर्मितीचा कारखाना आहे. त्यांनी मोर्शी येथील ओंकार श्रीराम काळे याला उधारीवर अगरबत्तीचा माल दिला होता. त्याच्याकडून पैसे येणे बाकी असल्याने जीवतरामानी यांना २७ हजार ३0 रुपयांचा धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे जीवतरामानी यांनी वकिलामार्फंत नोटीस पाठविली होती. ओंकारने नोटीसचे उत्तर न दिल्याने जीवतरामानी न्यायालयात प्रकरण दाखल केले. याप्रकरणी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी गजाला अलअमोडी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्हीकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर ओंकारला एक महिन्याचा कारावास व ३0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तक्रारकर्त्याकडून अँड. सुशील तलरेजा यांनी बाजू मांडली.
धनादेश अनादरप्रकरणी आरोपीस कारावास
By admin | Updated: October 29, 2014 01:45 IST