शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 5:10 PM

गत दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावामुळे जीएमसीला रुग्णावाहिकेची प्रतीक्षा कायम आहे.

अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोपचार रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका देण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. तसा प्रस्ताव देखील जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, अद्यापही रुग्णवाहिका खरेदी प्रलंबित आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाकडे सद्यस्थितीत केवळ एकच रुग्णवाहिका आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वोपचार रुग्णालयाला खासगी रुग्णवाहिकांवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यात मोठा शासकीय कार्यक्रम किंवा मंत्री आल्यास ही रुग्णवाहिका त्यांच्यासाठी राखीव ठेवली जाते. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालयासाठी अतिरिक्त रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. मध्यंतरी आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी सर्वोपचार रुग्णालयासाठी दोन रुग्णवाहिका देण्याचे निर्देश दिले होते. तसा प्रस्ताव देखील जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडे रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या प्रस्तावावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. गत दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावामुळे जीएमसीला रुग्णावाहिकेची प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय