शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

मालमत्ता पुनर्मूल्यांकन सुधारित देयकांचे गुरुवारपासून वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:00 IST

अकोला : महापालिकेने शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’  प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन करून सुधारित करवाढ केली. कराच्या  वाढीव रकमेतून ५५  टक्क्यांची सूट दिल्यानंतर प्रशासनाने वि तरित केलेल्या देयकांमध्ये सुधारणा केल्या आहेत. मालमत्ता  पुनर्मूल्यांकनाचे आक्षेप निकाली काढल्यानंतर  अकोलेकरांना  येत्या गुरुवारपासून मालमत्तांच्या सुधारित देयकांचे वितरण केले  जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व आणि दक्षिण झोनचा समावेश   आहे.

ठळक मुद्देदोन टप्प्यांत देयकांचे वितरण; पहिल्या टप्प्यात पूर्व आणि दक्षिण झोनचा समावेशवाढीव रकमेतून ५५  टक्क्यांची सूट दिल्यानंतर प्रशासनाने वितरित केलेल्या देयकांमध्ये सुधारणा केल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेने शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’  प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन करून सुधारित करवाढ केली. कराच्या  वाढीव रकमेतून ५५  टक्क्यांची सूट दिल्यानंतर प्रशासनाने वि तरित केलेल्या देयकांमध्ये सुधारणा केल्या आहेत. मालमत्ता  पुनर्मूल्यांकनाचे आक्षेप निकाली काढल्यानंतर  अकोलेकरांना  येत्या गुरुवारपासून मालमत्तांच्या सुधारित देयकांचे वितरण केले  जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व आणि दक्षिण झोनचा समावेश   आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत  आहे. १९९८ पासून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न झाल्यामुळे  शहरात एकूण  मालमत्ताधारक किती आणि कर स्वरूपातील उ त्पन्न किती, याचा ताळमेळ नव्हता. २00१ मध्ये प्रशासनाने  मालमत्ताधारकांच्या मदतीने ‘सेल्फ  असेसमेंट’ (स्वत: केलेले  पुनर्मूल्यांकन) करीत अत्यल्प करवाढ लागू केली होती.  परिणामी मालमत्तांपासून मिळणारे उत्पन्न १६ कोटींच्या पार  गेले  नाही. यादरम्यान, शासनाकडून विकास कामांसाठी प्राप्त  होणार्‍या निधीत उर्वरित हिस्सा (मॅचिंग फंड) जमा करण्यासाठी  प्रशासनाकडे निधी  नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांपासून शहराला  वंचित राहावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली. महा पालिका आयुक्त अजय लहाने यांनी  ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे  मालमत्ता पुनर्मूल्यांकनाला सुरुवात केल्यानंतर एक-दोन हजार  नव्हे, तर तब्बल ३१ हजार मालमत्ताधारकांना कर  आकारणी  झालीच नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. सद्यस्थितीत १  लाख ४ हजार मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन झाले असून, प्रशासनाने  टप्प्या-टप्प्यानुसार झोननिहाय आक्षेपांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण  केली आहे. सत्ताधारी भाजपाने वाढीव कर रकमेतून ५५ टक्के  रक्कम कमी केली. त्यानुषंगाने प्रशासनाच्यावतीने येत्या गुरुवार पासून (५ ऑक्टोबर) नागरिकांना सुधारित देयकांचे वितरण  केले जाणार आहे. 

दोन टप्प्यांत देयकांचे वितरणप्रशासनाने सुरुवातीला वाढीव कर रकमेच्या देयकांचे वितरण  केले. त्यानंतर या रकमेतून सरासरी २0 टक्के रक्कम कमी करण्यात  आली. कमी केलेल्या रकमेसह सुधारित देयकांचे नागरिकांना  घरपोच वाटप केले जाईल. पहिल्या टप्प्यात पूर्व झोन आणि  दक्षिण झोनमध्ये त्यानंतर पश्‍चिम झोन आणि उत्तर झोनमध्ये वि तरण होईल. यासाठी ७0 जणांची चमू तयार केली आहे.