विवेक चांदूरकर/ अकोलासंपूर्ण राज्यातील लाखो हेक्टरवरील सागवानच्या झाडावर सध्या किडीने आक्रमण केल्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. किडीचे प्रमाण प्रचंड असून, सागवान लागवडीचा परिसर मोठा असल्यामुळे वनविभागही हतबल झाला आहे. गत काही वर्षांपासून सागवानच्या झाडांवर ह्यकिक डिफोलिएटर क्युरियाह्ण नावाच्या किडीने आक्रमण केले आहे. दरवर्षी पावसाळ्यातच ही कीड केवळ सागवानवरच येत असून, ती झाडाची हिरवी पाने खाते. ही कीड संपूर्ण पानाची चाळणी करते, त्यामुळे पानं सुकून गळून पडतात. सागवानच्या झाडाला उन्हाळ्यात पानगळ लागते. पावसाळ्याला सुरूवात होताच झाडाला कोवळी हिरवी पाने यायला सुरूवात होते. यामुळे संपूर्ण जंगल हिरवेगार होते; मात्र गत काही वर्षांपासून सागाला ऐन पावसाळ्यातच किड लागत असल्याने, पावसाळ्य़ातही सागवानच्या जंगलात हिरवळ दिसून येत नाही. आकोट वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक उमेश वर्मा यांनी सागांच्या झाडांवरील किडींवर किटकनाशकांची फवारणी करता येत नसल्याने त्यावर उपाययोजना करणे शक्य नसल्याचे सांगीतले. **किडीमुळे झाडांची वाढ खुंटली सागवानच्या झाडांवर पावसाळ्याच्या सुरूवातीलाच कीड येते. या काळात झाडाचा बुंधा वाढतो आणि उंचीही वाढते; मात्र ऐन पावसाळय़ातच ही कीड आक्रमण करीत असल्याने पानांची चाळणी होते आणि झाडांचे अन्नद्रव्य शोषण थांबते. परिणामी झाडाची वाढ खुंटत असून, सागवानसारख्या मौल्यवान वनसंपत् तीचे मोठे नुकसान होत आहे. **उपायच नाही सागवानच्या झाडांवर येणार्या या किडीवर नियंत्रण मिळविण्य़ासाठी कोणताही उपाय अद्याप शोधण्यात आला नाही. राज्यातील सागवानचे क्षेत्र मोठे असल्याने किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे या किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी किटकनाशकांची फवारणी करणे शक्य नाही. या किडीचा प्रादुर्भावच होऊ नये, यासाठी वनविभागाने उपाययोजना करणे आवश्यक होते; मात्र त्यासाठी कोणत्याही उपायायोजना करण्यात आल्या नाही आणि कोणतेही संशोधन सुरू नाही, हे विशेष.
लाखो हेक्टरवरील सागवानवर किडींचा प्रादुर्भाव
By admin | Updated: September 11, 2014 22:44 IST